Baramati ByPoll : बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार आणि भाजपचे आमदार दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधानामुळं या जागा रिक्त झाल्या होत्या. दोन्ही ठिकाणची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळं इथं पोटनिवडणूक लागली आज यासाठी दोन्ही मतदारसंघात मतदान पार पडलं. दोन्ही ठिकाणी सरासरी मतदान झालं आहे.
बारामतीत ५७.४८ टक्के मतदान पार पडलं तर राहुरीत ५५.३१ टक्के मतदान झालं. यामध्ये बारामतीत ६१.६१ टक्के पुरुष मतदारांनी तर ५३.२९ टक्के महिला मतदारांनी आणि ४.४८ टक्के तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर राहुरीत ५८.५९ टक्के पुरुषांनी तर ५१.८० टक्के महिला मतदारांनी मतदान केलं. सकाळी सात वाजल्यापासून या दोन्ही मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली त्यानंतर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडलं.
दरम्यान, दोन्ही मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही. बारामतीत सुरुवातीला सुमारे ५६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये काँग्रेसनंही आपला उमेदवार दिला होता. पण खुद्द सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्ज मागे घेण्याबाबत विनंती झाल्यानंतर काँग्रेसनं आपली उमेदवारी मागे घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीतून निवडणूक लढवली.
तर राहुरीतून शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपनं उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात इथून विरोधी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून प्राजक्त तनपुरे हे अर्ज भरणार असल्याची चर्चा होती पण त्यांनी अर्ज दाखल केला नाही. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी आपला अर्ज कायम ठेवला त्यामुळं इथं निवडणूक पार पडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.