Donald Trump: हॉर्मुजमध्ये दिसताक्षणी गोळ्या घाला! ट्रम्प यांचे नौदलाला आदेश; युद्ध आणखी भडकणार?

अमेरिका आणि इराण युद्धाचा आता नवा अंक जगाला पाहायला मिळणार आहे. कारण या युद्धासाठी सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झालेला असला तरी ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Iran conditions ceasefire
Donald Trump Sarkarnama
Published on
Updated on

Donald Trump: अमेरिका आणि इराण युद्धाचा आता नवा अंक जगाला पाहायला मिळणार आहे. कारण या युद्धासाठी सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झालेला असला तरी ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हॉर्मुजची सामुद्रधुनी हा या खेळातला एकमेव महत्वाचा भाग असल्यानं आणि तो इराणच्या नियंत्रणाखाली असल्यानं अमेरिकेलाही हतबल व्हायला झालं आहे. पण आता ट्रम्प यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला असून हॉर्मुजमध्ये दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश आपल्या नौदलाला दिले आहेत. त्यामुळं हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्हं आहेत, किंवा ते निर्णायक तरी ठरु शकतं.

Iran conditions ceasefire
डिजिटल जनगणना महाराष्ट्रात 1 मे पासून सुरु: नागरिकांनाही करता येणार स्व-गणना

ट्रम्प यांनी काय दिलेत आदेश?

हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणविरोधातील जहाजांना बुडवण्यासाठी ज्या कुठल्या छोट्या नौका किंवा जहाजं पाण्यामध्ये सुरुंग पेरताना दिसतील या नौकांना तिथंच जलसमाधी द्या, दिसताक्षणी त्यांच्या क्रू मेंबरवर गोळ्या घाला आणि नौका उडवून द्या, असे आदेश ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला दिले आहेत. यासाठी कुठलाही विचार करायचा नाही, कुठल्याही आदेशाची वाट पाहायची नाही की कुठलाही इशारा देण्याच्या भानगडीत पडायचं नाही, थेट तुटून पडायचं अशी मुभाच ट्रम्प यांनी नौदलला दिली आहे. त्याचबरोबर हे पेरलेले सुरुंग शोधून ते निकामी करण्याची मोहिम देखील तिप्पट वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ट्रम्प यांचं हे विधान अशा वेळी आलं आहे ज्यावेळी हॉर्मुज सामुद्रधुनी ही आधीच जगासाठी अत्यंत तणावपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग बनला आहे. कारण इथूनच पश्चिम-मध्य-पूर्व जगाचा भाग हा जोडला जातो किंबहुना इथूनच मोठ्या प्रमाणावर तेलाची वाहतूक पूर्वेकडील देशांना केली जाते. यामध्ये पाकिस्तान, चीन, भारत ही आशिया खंडातील महत्वाचे देश यावर अवलंबून आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com