Abhimanyu Kshirsagar  Sarkarnama
महाराष्ट्र

Beed Accident : बीड जिल्हा पुन्हा हादरला! आणखी एका सरपंचाचा मृत्यू; घात की अपघात?

Abhimanyu Kshirsagar Sarpanch of Saundana Village Died:अभिमन्यू क्षीरसागर असे मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव आहे. ते सौंदाना गावचे सरपंच होते. मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला.

Mangesh Mahale

beed Accident news:बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महिन्याभरात आणखी एका सरपंचाचे मृत्यू झाला आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

अभिमन्यू क्षीरसागर असे मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव आहे. ते सौंदाना गावचे सरपंच होते. मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला. हा अपघात की घात आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे दुचाकीवरुन जात असताना मिरवट फाट्यावर येथे हा अपघात झाला. अभिमन्यू क्षीरसागर यांना राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिली. ते खाली कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास सुरु असताना महिनाभरात दुसऱ्या एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे, पुढील तपास बीड पोलीस करीत आहे. राखेचा टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा घात की अपघात आहे, अशी शंका भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ जणांना मोका लावण्यात आला आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे.तो अद्याप फरार कसा, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आज याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT