
Beed News:बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्यातील विविध शहरामध्ये मोर्चे काढले जात आहेत. आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. अंबड चौफुली येथे आक्रोश सभा झाली. या सभेत संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख हीचा भावनांना बांध फुटला. भरसभेत ती ढसाढसा रडली. तिच्या भाषणानंतर उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
"ज्यांनी माझ्या पप्पांना मारलं त्यांना मी विचारते का तु्म्ही माझ्या पप्पांना इतकं छळ करुन मारलं. त्यावेळेस त्यांना किती वेदना झाल्या असतील," असे सांगताना वैभवीला रडू कोसळलं. "आज आम्ही रस्त्यावरुन चालत असताना आम्हाला धक्का लागू नये, म्हणून तुम्ही आमची काळजी घेतात, त्यामुळे तुमचे मी आभार मानते. आज तुम्ही आमच्या पाठिंशी जसे आहात,तसेच कायम राहा," असे वैभवीनं उपस्थितांना सांगितले.
आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाही तरीदेखील तुम्ही आम्हाला सहकार्य करतात. पण माझा आरोपींना एक प्रश्न आहे की, तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारले? त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील, असे वैभवी म्हणाली.
"मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजते, की मी देशमुख कुटुंबियांची लेक आहे. पण आज मी माझ्या वडिलांसोबत नाही, याची मला खंत वाटते. पप्पा आज तु्म्ही जिथं कुठे असाल, तिथं हसत राहा, आजपर्यंत तुम्ही जसे हसत राहिलात तसेच तिथं हसत राहा, आम्ही तुम्हाला वाचवू नाही, शकलो, आम्हाला माफ करा," असे म्हणत वैभवी देशमुख हील अश्रू अनावर झाले.
संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना पूर्ण झाला आहे. पोलीस, सीआयडीच्या तपासाची चक्र वेगानं फिरत आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या घटनेची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे. सोनवणे यांनी याबाबत मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक क्रानूगनो यांची भेट घेतली आहे.आयोगात तक्रार केली असून लवकरच आयोग चौकशीला सुरवात करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.