Anjali Damania  Sarkarnama
महाराष्ट्र

Anjali Damaniya : बीडमधील स्फोटक माहिती, व्हिडीओ कोण पुरवतंय; अंजली दमानियांनी दिले 'हे' उत्तर

Beed explosive information News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला 19 दिवस उलटले आहेत. तरीही या प्रकरणातील सगळ्या आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे शनिवारी बीडमध्ये मोठा मोर्चा निघाला.

सरकारनामा ब्युरो

Beed video controversy News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्यभरातील वातावरण तापले आहे. देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला 19 दिवस उलटले आहेत. तरीही या प्रकरणातील सगळ्या आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे शनिवारी बीडमध्ये मोठा मोर्चा निघाला. त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा मानला जाणारा वाल्मिक कराड फरार आहे. त्याच्या अटकेची मागणी जोर धरत असतानाच दुसरीकडे अंजली दमानिया यांना बीड जिल्ह्यातील स्फोटक माहिती, फोटो, व्हिडीओ कोण पुरवतंय, असा प्रश्न पडला असताना त्याचे उत्तर त्यांनी दिले आहे.

बीड जिल्हयात 2011-12 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्याकाळी अंजली दमानिया, प्रीती मेनन यांनी याठिकाणी काम केले आहे. बीड जिल्ह्यातील खेडेगावांमध्ये पाण्याच्या टाक्या दिल्या होत्या. त्यावेळी दुष्काळात चारा घोटाळा झाला होता. त्या काळात राजेश टोपे, सुरेश धस (Suresh Dhas), जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात मी लढले. त्यावेळी अनेक लोक आम्हाला रात्री प्रवास करु नका. हा मिनी बिहार आहे. येथे रात्री गाड्या थांबवून लूटमार केली जाते, असे सांगत होते. 2014 नंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. कारण धनंजय मुंडे (Dhananjay Munde), पंकजा मुंडेंचे प्रस्थ याठिकाणी वाढले. त्यासोबतच कराडसारखी मंडळीची दहशत वाढली, असा आरोप यावेळी अंजली दमानिया यांनी केला.

बीडमधील स्फोटक माहिती कशी मिळवली, त्याचे उत्तरही दमानियांनी दिले. याठिकाणी आधी कलेक्टरना ईमेल केला. बंदुका किती आहेत त्याची विचारणा केली. त्यासोबतच बंदुका, परवान्यांची पीडीएफ फाईल मागवली, त्यामध्ये 1 हजार 222 शस्त्र परवाने बीडमध्ये असल्याचे समोर आले. मग अनधिकृत किती असतील? याची माहिती घेतली.

'मी ट्विटरवर एक मेसेज केला. त्यात एक नंबर दिला. ज्यांच्याकडे बीडमधील गुंडगिरी, दहशत दाखवणारे फोटो, व्हिडीओ असतील, ते त्यांनी पाठवावेत, असे आवाहन केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात फोन येण्यास सुरवात झाली. व्हिडीओ, फोटो यायला लागले, व्हॉट्सऍपवर मेसेज येत होते. प्रत्येक मेसेजमध्ये खाली लिहिलेले असायचे, कृपया आमचे नाव बाहेर येऊ देऊ नका. यातून बीडमध्ये दहशत किती आहे ते दिसले' असे दमानियांनी स्पष्ट केले.

माझ्याकडे आलेली माहिती मी ट्विट करत होते. त्यासोबतच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना पाठवत होते. मग ती माहिती ट्विट करत होते. कावत यांनी प्रत्येक मेसेजची दखल घेऊन गुन्हे नोंदवायला सुरुवात केली. त्यासोबत शस्त्रं परवाने परत घेण्यास सुरुवात केली. याचा फायदा झाला असल्याचे दमानिया म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT