Beed Police News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. देशमुखांच्या हत्येनंतर बीड पोलिसांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. काही पोलिस कर्मचारी हे कराडच्या खास मर्जीतील असल्याचे देखील बोलले जात होते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वाल्मिक कराडांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची यादीच दिली होती.
देसाई यांनी 26 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी देताना ते वाल्मिक कराडच्या खास मर्जीतले असल्याचे म्हटले होते. जानेवारी महिन्यात त्यांनी ही यादी प्रसिद्ध केली होती. याची दखल बीडच्या पोलिस अधिक्षक कार्यालयाने घेतली असून
तृप्ती देसाईंना चौकशीसाठी बोलवले आहे. 17 तारखेला बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
26 पोलिस हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप देसाई यांनी केले होते. मात्र, त्या संदर्भात कोणतेही पुरावे दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी जे आरोप केले आहेत त्या संदर्भात पुरावे घेऊन हजर राहण्याची नोटीस बीड पोलिसांनी बजावली आहे.
नोटीसीमध्ये म्हटले आहे की, तक्रार प्राप्त झाली मात्र पुरावे मिळाले नाहीत. हे आरोप सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडील असलेले पुरावे घेऊन या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता एसपी ऑफीसला हजर राहा.
तृप्ती देसाई यांनी 27 जानेवारीला आपल्या फेसबूकवर पोस्ट करत 26 अधिकारी वाल्मिक कराडचे मर्जीतील असल्याचे म्हटले होते. तसेच गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सर्व खात्रीलायक चौकशी करून त्यांची बदली बीड जिल्ह्याच्या बाहेर करणे गरजेचे आहे, तरच आपण बीड जिल्ह्यातील गुंडाराज रोखू शकतो, असे म्हटले होते.
देसाई यांनी शेअर केलेल्या यादीमध्ये बाळराजे दराडे, रंगनाथ जगताप, भागवत शेलार, संजय राठोड , त्रिंबक चोपने , बन्सोड , कागने सतीश ,दहिफळे, सचिन सानप , राजाभाऊ ओताडे, बांगर बाबासाहेब, विष्णु फड , प्रविण बांगर , अमोल गायकवाड ,राजकुमार मुंडे , शेख जमीर, चोवले , रवि केंद्रे,बापू राऊत, केंद्रे भास्कर,दिलीप गित्ते, डापकर, भताने गोविंद , विलास खरात , बाला डाकने,घुगे या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे होती.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.