
Nashi News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. येथील ट्रायल कोर्टाने कोकाटेंना दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. यामुळे त्यांच्या आमदारकीवरील टांगली तलवार दूर झाली आहे. मात्र न्यायालयाने निर्णय देताना केलेल्या निरीक्षणाची चांगलीच चर्चा आता राज्यभर होताना दिसत आहे. कोकाटे यांना शिक्षा सुनावली असती तर जनतेचा पैसा खर्च झाला असता, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.
1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूवर आहे. याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या मुलीने याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. या दाखल गुन्ह्यात माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता.
याबाबत कनिष्ठ न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच न्यायालयाने 20 फेब्रुवारी रोजी कोकाटे यांना दोषी ठरवले होते. तसेच त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली होती. पण त्यानंतर कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात धाव घेत दोन वर्षाच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं.
नाशिक सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देत कोकाटेंना मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचलीय पण, कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीचा निकाल देतांना कोर्टाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. याचीच सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
नाशिक सत्र न्यायालयाने, कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र ठरले असते. अपात्र ठरल्याने त्यांच्या जागेवर पोटनिवडणुक घ्यावी लागली असती. ज्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला असता. पोटनिवडणुकीसाठी जनतेचा पैसा खर्च झाला असता. हाच खर्च टाळण्यासाठी कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याचे निरीक्षण नोंदवले न्यायालयाने नोंदवले आहे.
कोकाटे यांना ट्रायल कोर्टाने सरकारी कोट्यातून चार घरं लाटल्याप्रकरणी दोषी ठरवत दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड ठोठावला होता. ज्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तसेच त्यांच्यासह महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.