Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणी संपेनात! आमदारकीही धोक्यात? आजच होणार फैसला!

Complaint against Dhananjay Mude will be heard :करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने परळीतील फौजदारी न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने याचिका केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस दिली होती.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. त्यानंतर मुंडेंनी प्रकृतीचे कारण देत मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर देखील त्यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. कारण करुणा शर्मा यांनी मुंडेंच्या विरोधात तक्रार दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार करुणा शर्मा यांनी दिली होती. या प्रकरणी प्रकरणी शनिवारी (ता.15) परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

करुणा शर्मा यांच्या तक्रारीनुसार, धनंजय मुंडे यांनी 2024 ची परळी विधानसभा निवडणुकीत लढताना शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुले तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. पण करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मिळकतीची माहिती लपवण्याचा आरोप करूणा शर्मा यांनी केला होता.

Dhananjay Munde
Mahayuti Government : निधी वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी? शिंदेंच्या मंत्र्याचा इशारा, म्हणाला, "तर उद्रेक होईल"

धनंजय मुंडे काय उत्तर देणार?

करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने परळीतील फौजदारी न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने याचिका केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस दिली होती. आत्ता या संदर्भात शनिवारी (दि.15) सुनावणी असल्याने धनंजय मुंडे काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोटगी देण्याचा आदेश

फेब्रुवारी महिन्यात धनंजय मुंडे यांना न्यायालाने करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा आदेश दिला होता. दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हा अंतरिम आदेश असून या संदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.मात्र, त्यातच करुणा शर्मा यांनी त्यांच्या नावावर असलेल्या मिळकतीची माहिती लपवल्याची तक्रार करून धनंजय मुडेंच्या अडचणीत भर घातली असल्याची चर्चा आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Dhananjay Munde
Bachchu Kadu On Patole : उपमुख्यमंत्री शिंदे अन् अजितदादांना CM पदाची ऑफर देणाऱ्या पटोलेंना बच्चू कडूंनी 'जागा'च दाखवली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com