Tanaji Sawant News Sarkarnama
महाराष्ट्र

Tanaji Sawant : आरोग्यमंत्र्यांच्या गावाशेजारीच बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; आरोग्य यंत्रणा सलाइनवर

Bengali doctor's practice next to health minister's village : माढा तालुक्याच्या परिसरात पश्चिम बंगाल येथून आलेल्या बोगस डॉक्टरांनी ग्रामीण भागात दवाखाने थाटले आहेत.

Harshal Bagal

Health Department : माढा तालुक्यातील बोगस डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गावातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आरोग्य यंत्रणेकडून या बोगस डॉक्टरवर कारवाई झाली नाही. माढा तालुक्याच्या परिसरात पश्चिम बंगाल येथून आलेल्या बोगस डॉक्टरांनी ग्रामीण भागात दवाखाने थाटले आहेत. त्यामुळे परिसरातील आरोग्य यंत्रणा सलाइनवर आहे.

माढा तालुक्याच्या मानेगाव भागामध्ये काही दिवसांखाली बोगस डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गावातील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. हा परिसर आरोग्यमंत्र्यांच्या जिल्हा परिषद गटात आहे. तरीही आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanjai Sawant) यांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे. माढा तालुक्याच्या परिसरात पश्चिम बंगाल येथून आलेल्या बोगस डॉक्टरांनी ग्रामीण भागात दवाखाने थाटले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या बालेकिल्ल्यातच बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याने येथील आरोग्य यंत्रणा सलाइनवर आहे.

ग्रामीण भागातील अडाणी शेतकरी शेतमजूर, कामगार, विद्यार्थी वर्गातील नागरिकांना बोगस डॉक्टरांबद्दल माहिती नाही. त्यामुळे बोगस डॉक्टरांकडून पेशंटला उपचार होतात. येथील पेशंटला बोगस डॉक्टरांकडून उपचार घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बोगस डॉक्टर शेतकऱ्यांचा आणि कामगारांच्या पैशावर लखपती झाले आहेत. आरोग्य विभागाला याची माहिती नाही, हे विशेष आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे गाव वाकाव हे अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे.

शरद पवारांपर्यंत तक्रार पोहोचवणारी महिला कोण?

माढा तालुक्यातील पूर्व भाग म्हणजे मानेगाव, वाकाव ही महत्त्वाची गावे, आरोग्यमंत्री सावंत यांच्या जिल्हा परिषद गटातील महत्त्वाची गावे आहेत. बंगालच्या परराज्यातून आलेल्या बोगस डॉक्टरांनी आपले दवाखाने थाटली आहेत. यावर अनेक शंका येत आहेत. परंतु या विषयाला गांभीर्याने घेत याची थेट तक्रार शरद पवारांकडे (Sharad Pawar) केली आहे. शरद पवारांकडे तक्रार करणारी महिला कोण ? याचीही चर्चा तालुक्यामध्ये होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रमोदिनी लांडगे यांनी यासंदर्भात पवारांकडे तक्रार केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढा तालुक्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी निधी नाकारला होता

प्रमोदिनी लांडगे या काही दिवसांखाली आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पुणे येथे भेटायला गेल्या होत्या. मानेगाव ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी सुविधा कमी आहेत. महिलांना प्रसूती करण्यापूर्वी ज्या सुविधा मिळायला पाहिजेत, त्या मिळत नाहीत. बाळंतपणाची सोय चांगली व्हावी. महिलांना अनेक सुविधा मिळाव्यात, अशा अशयाच्या मागण्या घेऊन प्रमोदिनी लांडगे आरोग्यमंत्र्यांना भेटायला गेले असता, मंत्री सावंत यांनी तुम्ही माढा तालुक्याच्या अडचणी घेऊन माझ्याकडे येऊ नका. तुम्ही परंडातल्या काही अडचणी असतील तर मला सांगा. मी लगेच सोडवतो, अशा स्वरूपाचा भेदाभेद आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT