Vidhnsabha Election : तेलंगणा राज्यात 30 नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने शेवटच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहाेचला आहे. या ठिकाणी बीआरएस, भाजप व काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत आहे. तेलंगणातील 119 विधानसभा जागांसाठी एकूण 2290 उमेदवार नशीब अजमावत आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत 222 म्हणजेच दहा टक्के महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामध्ये 521 उमेदवारांवर गुन्हे दाखल झाले आहेत, तर 352 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
तेलंगणात एकूण उमेदवारांच्या तुलनेत गुन्हे दाखल होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण 23 टक्के इतके आहे, तर 15 टक्के जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत हेच प्रमाण 21 टक्के इतके होते. राष्ट्रीय पक्षांच्या 61 जणांविरोधात गुन्हे दाखल आहेत, तर त्यापैकी 42 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसरीकडे स्थानिक पक्षाचा विचार केला, तर 43 जणांविरोधात गुन्हे दाखल आहेत. 26 जणांविरोधात गंभीर गुन्हे आहेत. नोंदणीकृत पक्षाच्या15 जणांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी नऊ जणांविरोधात गंभीर गुन्हे आहेत. अपक्ष 14 जणांविरोधात गुन्हे दाखल आहेत, तर त्यापैकी नऊ जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तेलंगणा विधानसभेच्या रणांगणात उतरलेल्या उमेदवारापैकी 25 टक्के म्हणजेच ५८० उमेदवारांची संपत्ती पाच कोटींपेक्षा अधिक आहे. 2 हजार 290 उमेदवारांच्या अभ्यासातून समोर आलेली आकडेवारी हेच सांगते की ही लढाई पैसेवाल्याची आहे. प्रमुख पक्ष असलेल्या बीआरएसचे 114, काँग्रेसचे 111, भाजपचे 94 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 210 उमेदवारांची संपत्ती पाच कोटींपेक्षा अधिक आहे. बीआरएसचे 96 टक्के उमेदवार, काँग्रेसचे 94 टक्के, तर भाजपचे 84 टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.