Congress MP Prashant Padole accident details Sarkarnama
महाराष्ट्र

Prashant Padole Accident : काँग्रेस खासदाराच्या कारचा भीषण अपघात, एकाच मार्गावर तिसऱ्यांदा घटना, कटाची शक्यता

MP Prashant Padole Convoy Accident: भंडारा-गोंदिया लोकसभेचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या ताफ्याला भीषण अपघात झाला. घटनेची सविस्तर माहिती जाणून घ्या.

Mangesh Mahale

Prashant Padole accident investigation details: संसद अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या काँग्रेस खासदाराच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातातून खासदार आणि त्यांचे सहकारी सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत.

भंडारा-गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या ताफ्याला भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी नागपूरजवळ हा अपघात झाला. पडोळे यांच्या ताफ्याला ट्रकची धडक बसली. एकाच मार्गावर तिसऱ्यांदा पटोळे यांचा अपघात झाला आहे. यामुळे या अपघातामागे कटाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खासदार डॉ. प्रशांत पडोळे आज सकाळी भंडारा येथून नागपूर विमानतळाच्या दिशेने निघाले होते. वाहनांचा ताफा नागपूरजवळील हल्दीराम समोर आला होता. तेव्हा एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

याच मार्गावर डॉ. पडोळे यांच्यासोबत झालेला हा तिसरा अपघात आहे. तिन्हीही वेळा अपघात एकाच मार्गावर, तिन्ही वेळा ताफ्यातील गाडीला 'ट्रक'नेच धडक दिल्याने संशय बळावला आहे. कार-ट्रक अपघाताची पद्धतही तिन्ही वेळेस सारखीच असल्याचे दिसते.

ट्रकने दिलेल्या धडकेत पडोळे याच्या कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, एअरबॅग्ज आणि वेळेत मिळालेल्या संरक्षणामुळे डॉ. पडोळे यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, असे पोलिस सुत्रांनी सांगितले.

ट्रक चालकाला नागपूर पोलिसांकडून ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहे. डॉ. पडोळे यांच्या अपघाताची माहिती मिळताच काँग्रेस काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT