Pankaja Munde News: राजकारण सोडल्यानंतर काय करणार? भागवत कथेत पंकजा मुंडे म्हणाल्या...

Pankaja Munde What Next After Quitting Politics? नाथरा गावात सध्या अध्यात्मिक वातावरण आहे. गावातील लेकींनी आयोजित केलेल्या श्रीमद् देवी भागवत कथेत या दोन्ही बहीण-भावांनी काल हजेरी लावली.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics News: लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे जन्मगाव आणि त्यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथरा गावात सध्या अध्यात्मिक वातावरण आहे.

गावातील लेकींनी आयोजित केलेल्या श्रीमद् देवी भागवत कथेत या दोन्ही बहीण-भावांनी काल हजेरी लावली. याच कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी "आपण राजकारण सोडल्यानंतर अध्यात्माच्या मार्गाने म्हणजेच तुमच्या सोबत येऊन हभप होणार," अशी मिश्किल टिप्पणी केली.

पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर सर्वत्र चर्चा होत आहे. यावेळी धार्मिक, अध्यात्मिक कामात सढळ हाताने आणि मोठ्या मनाने आर्थिक मदत करणाऱ्यांचे पंकजा मुंडे यांनी कौतुक केले. ऊस कापणीला जातांना पायाचे रक्त सांडते, त्या कष्टातून कमावलेला पैसा तुम्ही धार्मिक कार्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता देता. तुम्ही किती मोठे आहात, आम्ही तुम्हाला काय देणार, अशा शब्दात भाविकांचे आभार व्यक्त केले.

Pankaja Munde News
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री? हवाला रॅकेटचे SIT च्या हाती लागले सबळ पुरावे; भ्रष्ट अधिकाऱ्यांनीच पुरवली रसद

आमच्या नाथरा गावी आज गावातील लेकींच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् देवी भागवत कथेचा सांगता समारोह झाला. याप्रसंगी ह.भ.प अंजलीताई केंद्रे उदगीरकर यांचे सुश्राव्य कीर्तन ऐकले. या श्रीमद् देवी भागवत कथेला लेकींचा विशेष मान असतो. कथेच्या माध्यमातून नाथरा येथील सर्व लेकी आज सन्मानाने आणि अभिमानाने एकत्र आल्या होत्या, त्यांच्याशी संवाद साधता आला.

Pankaja Munde News
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार का? पोलिस आयुक्त काय म्हणाले?

अध्यात्म आणि एकजुटीची गोडी लावणारा हा सुंदर सोहळा आयोजित केल्याबद्दल सर्वांचे आभार पंकजा मुंडे यांनी मानले. सर्वांना यश, कीर्ती, आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देऊन सर्वांच्या उज्वल भविष्याची कामना त्यांनी व्यक्त केली. या सोहळ्यात आमदार धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com