Eknath Shinde, Devendra fadnavis  Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मोठी बातमी: सरनाईकांना दणका देणारा 'तो' निर्णय मागे; CM फडणवीसांनी शिंदेंसोबतचा वाढत चाललेला दुरावा झटक्यातच दूर केला!

Devendra Fadnavis Eknath Shinde Pratap Sarnaik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना एकाचवेळी मोठा धक्का दिला होता

Deepak Kulkarni

Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना एकाचवेळी मोठा धक्का दिला होता.त्यांनी एसटी महामंडळाचे मुख्य अप्पर सचिव संजीव सेठी यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली होती. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या जवळचे सेठी यांच्या हाती एसटीचं स्टेअरिंग दिल्यानं एकप्रकारे शिंदेंना धक्का दिल्याचं बोललं जात आहे. पण आता मुख्यमंत्री फडणवीसांनी (Devendra Fadnavis ) गेल्या काही महिन्यांपासून शिंदेंसोबतचा वाढत चाललेला दुरावा एका झटक्यात दूर केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्य अप्पर सचिव संजीव सेठी यांच्याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तसेच मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे फक्त नावापुरतंच परिवहन खातं राहणार अशी चर्चाही जोर धरू लागली होती. पण शुक्रवारी(ता.7) मध्यरात्री अचानक सूत्रे फिरली. मुख्यमंत्र्‍यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतला.

आता पुन्हा एकदा 'MSRTC'चं अध्यक्षपद परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांकडे आलं आहे. सरनाईकांच्या नियुक्ती पत्रावर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी सही केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसोबतचा(Eknath Shinde) वाढत चाललेला दुरावा कुठेतरी कमी करण्यासाठी पावले उचलली असल्याचे बोलले जात आहेत.

राज्य सरकारमध्ये याआधी परिवहन मंत्रीच एसटी महामंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. पण मुख्यमंत्री फडणवीसांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्य अप्पर सचिव संजीव सेठी यांच्याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

याआधी महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडून ज्या जिल्ह्यात त्यांचा पालकमंत्री नाहीत, तिथं संपर्कमंत्री हे नवं पद निर्माण करुन मित्रपक्षांना धक्का दिला होता.आता त्यांनी राज्य सरकारमध्ये नवेही बदल करुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्‍यांवर अंकुश ठेवण्याचं रणनीती आखल्याचं बोललं जात होतं.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर काहीच दिवसांत एसटीच्या बस प्रवासात 14.95 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पण त्यानंतर दरवाढीवरुन राज्यभरात प्रवाशांची तीव्र नाराजीची लाट उसळली होती. तसेच विरोधकांनीही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता.

अशातच एसटी दरवाढीच्यासंबंधी मला काहीच कल्पना नव्हती,असे विधान करून मंत्री आणि अधिकारी यांच्यात अजिबात समन्वय नसल्याची एकप्रकारे कबुलीच दिली होती.त्यामुळे परिवहनमंत्र्यांना न विचारताच भाडेवाढ झाली का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT