Abu Azmi : 'दोन्ही छत्रपतींचा आदरच करतोय, निलंबन रद्द करा'; अबू आझमींचे नार्वेकरांना पत्र

SP Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली होती. त्यावरून विधानसभेत मोठा गदारोळ झाला. यानंतर त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनसंपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
Abu Azmi
Abu AzmiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्याने राज्यभर संतापाची लाट उसळळी होती. सभागृहात देखील याचे पडसाद उमटले होते. तर त्यांची आमदाराकीच रद्द करण्याची मागणी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. मात्र विधानसभेत एकमताने ठराव मंजूर करून त्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांना विधानभवनाच्या आवारात देखील येऊ नका अशा सूचना करण्यात आल्या आहेत. यानंतर आता अबू आझमी यांनी आपले निलंबन रद्द करण्यासाठी खटाटोप सुरू केला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं म्हणत त्याचे कौतुक केलं होतं. त्यांनी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात ही विधान केलं होतं. यामुळे दोन्ही सभागृहात मोठा वाद निर्माण झाला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर आझमी यांनी आपलं विधान मागे घेत, माझं म्हणणं तसं नव्हतं, या विषयाला राजकीय वळण दिलं जातय असा दावा केला होता. पण त्यानंतर त्यांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रस्तावाला मान्यता देत अधिवेशन कालावधी संपेपर्यंत निलंबित केलं.

पण दोन्ही सभागृहात अबू आझमी यांची आमदारकीच रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच आझमींचे निलंबन अधिवेशन संपेपर्यंतच का? असा करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आमचे दैवत असून त्यांचा अपमान आझमींनी केला आहे. त्यामुळे त्यांची आमदाराकीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी करताना प्रस्ताव बदलावा अशा सूचना केल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एका अधिवेशन कालावधीपेक्षा जास्त निलंबनाची कारवाई करता येत नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केल्याने आझमी यांची आमदारकी वाचली आहे.

Abu Azmi
Imtiaz Jaleel On Abu Azmi : अबू आझमींच्या निलंबनाची कारवाई मला मान्य नाही! इम्तियाज जलील संतापले

यानंतर आता अबू आझमी यांनी सभापती राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात, "मी जे काही बोललो ते प्रत्यक्षात इतर अनेक इतिहासकार आणि लेखकांच्या अभ्यासावर आधारित असल्याचा दावा केला आहे. आपण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांचाही आपण आदर करतोच. त्यामुळे निलंबन रद्द करण्याची आदरपूर्वक विनंती करत असल्याचे अबू आझमी यांनी सभापती राहुल नार्वेकर यांना म्हटलं आहे.

Abu Azmi
Abu Azmi reaction : विधानसभेतून निलंबित झालेल्या अबू आझमींनी शिवरायांच्या फोटोसमोर बसून दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

या आधी देखील मागितली माफी

आपल्या विधानामुळे वाढता वाद पाहता आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेताना एक्सवर पोस्ट करत माफी मागितली होती. आझमी यांनी, "माझ्या विधानाची मोड-तोड केली जातेय. मी औरंगजेब यांच्याबद्दल जी वक्तव्य केली ती इतिहासकारांनी मांडली आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कुठल्याही महापुरुषाबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेलं नाही. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. माझ्या वक्तव्याला राजकीय वळण दिलं जात आहे. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन तहकूब होणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे जनतेचं नुकसान होतंय," असेही आझमी यांनी आपल्या पोष्टमध्ये म्हटलं होतं.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com