
Kirit Somaiya found 181 Bangladeshi : शासकीय योजनेचे लाभार्थी निवडताना प्रशासन सामान्यांची अक्षरशा दमछाक होते. मात्र भादवन (कळवन) या गावात कृषी विभागाने डोळ्यांवर पट्टी बांधली होती की काय? अशी स्थिती समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या एका दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे. तर ग्रामस्थांना कळते, भाजप नेते किरीट सोमय्या यांना समजते, मात्र कृषी विभागाला कळत नाही अशी स्थिती आहे.
भादवण (कळवण) या गावात एकही मुस्लिम नागरिक रहिवासी नाही. मात्र चक्क 181 बांगलादेशी नागरिकांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ देण्यात आल्याचे खळबळजनक प्रकार आता उघडकीस आला आहे. पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी काही ग्रामस्थांनी तपासली तेव्हा त्यांना ही धक्कादायक बाब समजली. त्यांनी याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांना कळविले. त्यानंतर सोमय्या थेट येथे दाखल होत कृषी विभागाची चांगली झाडाझडती घेतली.
भादवण (कळवण) या गावात 181 लाभार्थ्यांची बँक खाते पश्चिम बंगाल राज्यातील असल्याचे उगड झाले आहे. विशेषतः बांगलादेश सीमा लगतच्या भागातील बँकांमध्ये ही खाती आहेत. कृषी विभागाने अनुदान मंजूर केल्यावर ते या खात्यांवर जमा झाले. ही सर्व लाभार्थ्यांची नावे देखील प्रचलित नाहीत.
ग्रामस्थ आणि सोमय्या यांनी काल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत चांगलेच फैलावर घेतले. तहसीलदार रोहिदास वारुळे, कृषी उपविभागीय अधिकारी अशोक डंबाळे आणि अन्य अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली. त्यांच्याकडून काही कागदपत्रे देखील घेण्यात आली. यासंदर्भात तातडीने पोलिसात तक्रार दाखल करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
ज्या बँक खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम जमा झाली. त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी ही सर्व खाती इन ऍक्टिव्ह असल्याचे आढळले. त्यामुळे सायबर गुन्हेगारांचा हा शासकीय निधीवर डल्ला तर नाही ना, असाही संशय येतो. मात्र एकंदरच एवढ्या सहजपणे कृषी विभागाने या लाभार्थ्यांच्या अनुदानाची शिफारस केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
भाजप नेते क्रियेट सोमय्या यांनी गेल्या दोन महिन्यात सातत्याने मालेगाव शहरात दौरे करून बोगस कागदपत्रांच्या आधारे देण्यात आलेल्या जन्म दाखल्यांविरुद्ध मोहीम उघडली होती. यामध्ये जवळपास 3000 नागरिकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मालेगावचे प्रकरण ताजे असतानाच कळवणमध्येही बांगलादेशी लाभार्थी आढळले आहेत. त्यामुळे राजकीय हवा चांगलीच तापली आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.