Sanidpan Bhumre, Sujay wikhe, vasant more  Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election News : मोठी बातमी! ...म्हणून संदिपान भुमरे, सुजय विखे अन् वसंत मोरेंचं स्वत:ला मतदान नाही

Sachin Waghmare

Election News : चौथ्या टप्प्याच्या प्रचारासाठी उडालेला आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा खाली बसल्यानंतर सोमवारी राज्यातील 11 मतदारसंघात मतदान होत आहे. या चौथ्या टप्प्यात राज्यातील दिगग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत अनेक मात्तबर मंडळींची कसोटी लागणार आहे.

सोमवारी सकाळपासूनच चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकात कोट्यवधी मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. परंतु अहमदनगरमधील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil), छत्रपती संभाजी नगरचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि पुण्यातील वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) या तीन उमेदवारांना स्वतःलाच मतदान करता आले नाही. या तीन जणांचे मतदान त्यांच्या मतदारसंघात नसल्याने त्यांना स्वतःलाच मतदान करता आले नाही. (Lok Sabha Election News)

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. संदीपान भुमरे हे पैठण मतदारसंघाचे आमदार आहेत, मात्र त्यांचा मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे त्यांचे मतदानही जालना मतदारसंघातल्या पैठणमध्ये येते. त्यामुळे त्यांना स्वतःला मतदान करता आले नाही.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी महायुतीकडून संदीपान भुमरे, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकात खैरे तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे नशीब अजमावणार आहेत.

अहमदनगरमध्ये महायुतीमधील भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. त्यांचेही मतदान अहमदनगरमध्ये नाही तर शिर्डी मतदारसंघातल्या लोणीमध्ये आहे. त्यांचे नाव या ठिकाणच्या मतदारयादीमध्ये आहे. त्यामुळे सुजय विखेंना स्वतःलाच मतदान करता आले नाही. सुजय विखे यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यात वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. मात्र, त्यांच ही नाव पुणे मतदारसंघात नाही. मोरे यांचे नाव कात्रजभागातील मतदारयादीत आहे. त्यामुळे हा भाग शिरुर मतदारसंघाला जोडलेला आहे. त्यामुळे त्यांना ही स्वतःला मतदान करता आलेले नाही.

वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी मनसेचा राजीनामा देत वंचितकडून निवडणूक लढवत आहेत. तर मोरेंविरोधात महायुतीचे मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर अशी लढत होत आहे.

SCROLL FOR NEXT