Chitra Wagh Nilesh Lanke sarkarnama
महाराष्ट्र

BJP On Nilesh Lanke : नीलेश लंकेंचा गज्या मारणेशी 'ऋणानुबंध' दिसला; वळणाचं पाणी वळणावर जातं...

Pradeep Pendhare

Chitra Wagh And Nilesh Lanke News : कुख्यात गुंड गज्या मारणे याच्याकडून साग्रसंगीत सत्कार स्वीकारल्यावरून भाजप आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खासदार नीलेश लंके आणि त्याच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला. 'गज्या मारणेशी ऋणानुबंध दिसला, वळणाचं पाणी वळणावरच जाणार', अशा शेलक्यात शब्दात चित्रा वाघ टोचणी करत खासदार सुप्रिया सुळे यांना देखील डिवचले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या घरी जाऊन सत्कार स्वीकरला. नीलेश लंके याचे चहा प्यायला बोलवण्याच्या निमित्ताने गज्या मारणे याच्या घरी जाणे झाले. त्यावेळी हा सत्कार झाला. गज्या मारणेची पार्श्वभूमी माहीत नसल्याचे सांगत नीलेश लंके यांनी माफी देखील मागितली. पण विरोधकांनी नीलेश लंके पुरता घेरला आहे. भाजप आणि प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट शेअर करत नीलेश लंके यांच्या या सत्काराबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वाभाडे काढले आहेत.

भाजपने (BJP) त्यांच्या ट्विटरवर या सत्काराचा व्हिडिओ शेअर करत कुख्यात गुंड गज्या मारणेकडून साग्रसंगीत सत्कार स्वीकारला. फोटो काढले. आता सोयीस्कररित्या म्हणतायेत गज्या मारणे कोण हे आम्हाला ठाऊक नव्हतं. नीलेश लंके यांच्या गुंडांनी नुकताच भाजप कार्यकर्त्याच्या गरोदर पत्नीवर हल्ला केला. गरोदर महिलेच्या पोटावर लाथा मारल्या. तसेच त्या कार्यकर्त्याच्या आईला आर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. आता कुख्यात गुंड गज्या मारणे तुमचा सत्कार करत आहेत. यावरून तुमचा आणि त्यांचा ऋणानुबंध दिसून येतो, अशा शेलक्या शब्दात भाजपने समाचार घेतला आहे.

भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील नीलेश लंके यांच्या या कृतीवर 'वळणाचं पाणी वळणावर गेलं;, अशा शब्दात टोचणी केली. खासदार महोदयांच्या गुंडांनी परवा एका गर्भवती भगिनीला पोटावर लाथा मारल्या, मारहाण केली. जातिवाचक शिवागीळ केली. एक असहाय आणि दलत महिलेची विटंबना करणे, यालाच ते पराक्रम समजत असावते. म्हणूनच आज त्या पराक्रमी कृत्याबद्दल त्यांनी स्वतःचा सत्कार करून घेतला असावा.

कदाचित आपल्या तोडीस तोड नग असावा, म्हणून एका गुंडाकडून ते हा सत्कार स्वीकारताना दिसले. आणि त्यांच्या पक्षाच्या मोठ्या ताई राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मगरीचे अश्रू ढाळताहेत. यावरूनच स्पष्ट होतं की, यांना ना त्या गर्भवती दलित महिलेच्या अब्रूची चाड, ना कायदा-सुव्यवस्थेचा आब.., असे चित्रा वाघ यांनी नीलेश लंके, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पक्षाला डिवचले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT