Rohit Pawar On Nilesh Lanke : नीलेश लंकेंचा गज्या मारणे भेटीचा 'कारनामा' असा घडला; रोहितदादा म्हणाले, "मी..."

Rohit Pawar reaction to Nilesh Lanke visit to Gaja Marne : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी कुख्यात गुंड गज्या मारणे भेटीच्या कारनाम्यावर आमदार रोहित पवार पुढे आले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अगोदर रोहित पवार यांनी पुढे येत, मी माफी मागतो, असे म्हटले आहे.
Rohit Pawar Nilesh Lanke Gaja Marne
Rohit Pawar Nilesh Lanke Gaja Marnesarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar And Nilesh Lanke News : कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारल्यानंतर खासदार नीलेश लंकेंभोवती अडचणी वाढल्या आहेत. मारणेच्या घरासमोरून जाताना चहा पिण्यासाठी नीलेश लंकेंना काहींनी थांबवले आणि तेथून गज्या मारणेच्या घरी गेले. विरोधकांनी नीलेश लंकेंच्या गज्या मारणे भेटीच्या कारमान्यावर टीकेची झोड उठवली आहे.

लोकसभेच्या धन्यवादासाठी ही गाठभेट असल्याची टीका विरोधकांकडून सुरू आहे. नीलेश लंकेंनी यावर सावरासावरी केली. पण यात लंके एकटे पडल्याचे दिसताच, त्यांच्या मदतीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याअगोदर आमदार रोहित पवार धावून आलेत. रोहितदादांनी स्वतः पुढे येत लंकेंच्या या भेटीबद्दल मी माफी मागतो, असे म्हटले. रोहित पवार यांची लंकेंच्या या कारनाम्यावर माफी का? असा प्रश्न आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी कुख्यात गज्या मारणे याची भेट घेत सत्कार स्वीकारला. ही भेट लंकेंना अडचणीची ठरली आहे. तसेच लंकेंच्या या सत्काराने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची देखील डोकेदुखी वाढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रवक्ते उमेश पाटील, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह विरोधकांनी खासदार लंकेंवर टीका करण्यास सुरूवात केली. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला देखील टार्गेट केले आहे. नीलेश लंकेंनी सावरासावरी केली. पण त्यात बनवेगिरी अधिक दिसली. नीलेश लंकेंच्या मदतीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अगोदर आमदार रोहित पवार धावून आले आणि मी माफी मागतो, असे म्हटले.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले आहे की, मीन नीलेश लंके यांच्या प्रचारात सक्रिय असलेला एक कार्यकर्ता आहे. जी गोष्ट घडली, ती तिच आहे. नीलेश लंके यांनी देखील याबद्दल माफी मागितली आहे. मी देखील माफी मागतो. या विषयावर आता कोणी राजकारण करू नये, अशी विनंती केली. रोहितदादांनी नीलेश लंकेंबाबत दाखवलेली तत्परता पक्षात चर्चेचा विषय ठरली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अगोदर रोहितदादांची यावर प्रतिक्रिया आल्याने पक्षातंर्गत स्पर्धा सुरू असल्याचे दर्शवते.

Rohit Pawar Nilesh Lanke Gaja Marne
Video Nilesh Lanke : नीलेश लंकेसाहब, 'यह पब्लिक है, सब जानती है'; गज्या मारणेच्या भेटीवर बनवाबनवी का?

दरम्यान, नगरमधील पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी चार महिन्यानंतर आपण स्वतःहून राजीनामा देणार असल्याचे म्हटले. जयंत पाटील यांचे हे वक्तव्य रोहित पवार यांच्याशी जोडले गेले. जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीमान्यावर भूमिका देखील रोहित पवार यांनी मांडली. लोकसभा निवडणुकीच्या यशातील श्रेय सामान्य जनतेला देण्याबाबत मी आणि जयंत पाटील एकाच विषयावर बोललो आणि मी जे ट्विट केलं होतं त्याचा अर्थ देखील वेगळा निघतो. त्यामुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत आपली कोणतीही भूमिका नसल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

Rohit Pawar Nilesh Lanke Gaja Marne
Vivek Kolhe : विवेक कोल्हेंचा आरोपांचा 'अग्निबाण'; 'सरकारी पाहुण्यांनी आता 'त्यांच्या' गुन्ह्यांची...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com