Video Nilesh Lanke News : 'गज्या मारणे की, गरम चाय की प्याली'; नीलेश लंकेंना भोवली !

Nilesh Lanke and Gaja Marne News : कुख्यात गुंड गजा मारणे याची चहा पिण्याच्या निमित्तानं घेतलेली भेट अडचणीची ठरणार आहे. खासदार लंकेंनी गुरुवारी मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
Nilesh Lanke And Gaja Marne
Nilesh Lanke And Gaja Marnesarkarnama

Ncp Political News : अहमदनगरचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणे याची चहा पिण्याच्या निमित्तानं घेतलेली भेट अडचणीची ठरणार आहे. खासदार लंकेंनी गुरुवारी गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

गजा मारणेने यावेळी निलेश लंकेंचा (Nilesh lanke) सत्कार केल्याचा व्हिडिओ समोर आला. लंके यांनी त्याच्याकडून सत्कारही स्वीकारला आहे. यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका केली जात असल्याने येत्या काळात त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Ncp) शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना मोठ्या फरकाने पराभूत केले. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणाचे संपूर्ण चित्रच पालटले आहे. नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीला पराभूत करीत महाविकास आघाडीने बाजी मारल्याने या ठिकाणचे राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता येत्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत.

त्यातच आता खासदार नीलेश लंके एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. गुरुवारी एका कार्यक्रमानंतर गुंड गजा मारणेची लंकेंनी भेट घेत सत्कार स्वीकारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या संदर्भात विरोधकांकडून आता येत्या काीळात खासदार लंके यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Nilesh Lanke And Gaja Marne
Rohit Pawar On Nilesh Lanke : नीलेश लंकेंचा गज्या मारणे भेटीचा 'कारनामा' असा घडला; रोहितदादा म्हणाले, "मी..."

या सर्व बातम्यांनंतर खासदार नीलेश लंके यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असतानाच या प्रकरणावरून काही जणांनी नीलेश लंके प्रकरणावरून राष्ट्र्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटावर आरोप केले जात आहेत. आता त्यांचा बराचसा वेळ हा विरोधकांकडून केला जात असलेल्या आरोपांवर उत्तर देण्याची वेळ आली आहे. लंके यांनी घेतलेल्या भेटीनंतर या मुद्दयावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar)गटाकडून केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार देखील गुंड गजा मारणे याच्या घरी गेले होते. त्यावेळेस त्यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून त्यांच्यावर मोठी टीका केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी चूक मान्य करीत पुन्हा, असे होणार नाही, अशी कबुली दिली. त्यामुळे प्रकरण शांत झाले होते.

Nilesh Lanke And Gaja Marne
Video Nilesh Lanke : नीलेश लंकेसाहब, 'यह पब्लिक है, सब जानती है'; गज्या मारणेच्या भेटीवर बनवाबनवी का?

त्यामुळे या घडलेल्या प्रकाराबाबत आता तेच कबूली आपण देणार आहात का? असा सवाल आमदार अमोल मिटकरींनी उपस्थित करीत लंकेंना घेरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कदाचित निवडून आल्यानंतर ज्यांचा सिंहाचा वाटा असतोय त्यांचे भेटीगाठी घेऊन आभार मानण्यासाठीच लंके गेले असावेत, असेही मिटकरी यांनी आरोप केला. त्यामुळे यावरून आता सत्ताधारी व विरोधकांत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंकेंनी गुंड गजा मारणेची घेतलेली भेट ही लोकसभेत त्याने केलेल्या मदतीचे आभार मानायला होती का?, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींनी उपस्थित केला आहे. गजा मारणेने बारामती आणि नगरमध्ये शरद पवार गटाला मदत केली का?, असा सवालही उपस्थित केला आहे.

Nilesh Lanke And Gaja Marne
Devyani Pharande : आमदार देवयानी फरांदे यांची हॅटट्रिक शक्य आहे का?

सत्ताधारी मंडळींकडून नीलेश लंकेंना टार्गेट केले जात असल्याचे पाहून त्यांच्या मदतीला माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya chavan) धावून आल्या आहेत. लंके एका पहिलवानाला भेटायला गेले होते. त्याठिकाणी उपस्थित असलेला हा व्यक्ती परिचित, असावा असे समजून त्यांनी गजा मारणेकडून सत्कार स्वीकारला. याचा अर्थ त्यांचा किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा काही संबंध आहे, असे होत नाही.

गजा मारणे याच्याशी झालेल्या भेटीनंतर सत्ताधारी मंडळीकडून लंकेंवर निशाणा साधला जात असल्याने लंके यांनी या आरोपांना उत्तर दिले आहे. गजा मारणे याच्याशी झालेली भेट ही केवळ अपघात होता. मला गजा मारणे यांची पार्श्वभूमी माहिती नव्हती. त्यासोबतच अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांना मीडियासमोर बोलण्यासाठी ठेवले असल्याने ते काहीही बोलत असतात. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यावी व आरोप करावेत, असा सल्ला त्यांना दिला.

दरम्यान, खासदार निलेश लंके या ठिकाणी गज्या मारणेना भेटण्यासाठी थांबले की गरम चहा पिण्यासाठी थांबले याची चर्चा असतानाच हे प्रकरण मात्र येत्या काळात लंकेना भोवणार आहे, अशी चर्चा यानिमित्ताने नागरिकात रंगली आहे.

Nilesh Lanke And Gaja Marne
Lok Sabha-Rajya Sabha MP : 'या' जिल्ह्याची बातच न्यारी; एक-दोन नव्हे तब्बल नऊ खासदार संसदेत...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com