Ambadas Danve News Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena Leader Ambadas Danve News : अंबादास दानवे म्हणतात, भाजप शिंदेंना रडवेल

BJP Chief Minister Eknath Shinde will cry for one seat in the assembly, criticizes Ambadas Danve : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मित्र पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल, असा शब्द दिला असताना दानवे यांनी मात्र शिंदेंच्या शिवसेनेला भाजप रडवेल, असा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT Political News : विधानसभा निवडणुक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्या (ता.17) सप्टेंबर च्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर टीका केली. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एका एका जागेसाठी रडवेल. अगदी सध्या आमदार असलेल्या जागा मिळवताना शिंदेंच्या पक्षाच्या तोंडाला फेस येईल, असा टोला दानवे यांनी लगावला.

मराठवाड्यात 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पुर्वसंध्येला राज्यमंत्री मंडळाची बैठक होईल, अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या वर्षी घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 45 हजार कोटींच्या योजनांची घोषणा मराठवाड्यासाठी केली होती. पण यातील कोणतीच घोषणा मिंधे सरकारला पुर्ण करता आलेली नाही. मग जनतेला तोंड कसे दाखवावे ? असा प्रश्न या सरकारला पडला असले, म्हणून त्यांनी बैठकच घेण्याचे टाळले, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

संभाजीनगरात पत्रकारांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप एकनाथ शिंदे यांना रडवल्याशिवाय राहणार नाही. शिंदे यांना रेट चे राजकारण चांगले कळते, पण भाजप यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. एक एक जागा मिळवण्यासाठी भाजपचे नेते शिंदेंना रडवतील, अगदी स्टॅंडिंग जागा मिळवताना मुख्यमंत्र्यांची दमछाक झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा अंबादास दानवे यांनी केला.

महायुतीच्या जागा वाटपाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष असताना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मित्र पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल, असा शब्द दिला असताना दानवे यांनी मात्र शिंदेंच्या शिवसेनेला भाजप रडवेल, असा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. (Ambadas Danve) शिवाय शिवसेनेच्या काही नेते, आमदारांकडून मैत्रीपुर्ण लढतीची भाषाही गेल्या काही दिवसापासून सुरु केली आहे. एकूणच महायुतीत जागा वाटपावरून भडका उडणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला फसवले..

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त 16 सप्टेंबर 2023 रोजी संभाजीनगरात राज्य सरकारने मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याच्या हेतूने मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. या बैठकीत तब्बल 100 पेक्षा अधिक घोषणा व 20 निर्णय घेण्यात आले होते. मराठवाड्यातील विकास कामांसाठी एकूण 37 हजार 16 कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या.

तसेच 9 हजार 67 कोटी 90 लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते. एका वर्षपूर्ती या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाकडे पाहिले असता राज्य शासनाने मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याची केलेली घोषणा हवेतच विरली असे म्हणावे लागेल. एकाही विकासात्मक कामाला अद्यापपर्यंत मुहर्त लागत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

मंत्रिमंडळ बैठकीच्या एक वर्षानंतर राज्य शासनाने केलेल्या घोषणांकडे पाहिले असता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मराठवाड्याची पूर्णतः फसवणूक केली असून एका वर्षात सर्व घोषणांकडे प्रशासकीय व शासकीय पातळीवर दुर्लक्ष करण्यात आले आहे. मागासले पण दूर करून मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करू, ही मुख्यमंत्र्यांची निव्वळ घोषणाच होती हे आता जनतेला कळून चुकले आहे, अशी टीका दानवे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT