Maharashtra Politics: लोकसभेत दाणादाण उडाल्यानंतर महायुतीला विधानसभेचे लक्ष लागलं आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जागावाटपावरून 'राडा' होण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीकडून सावध पावले टाकली जात आहेत. पितृपक्षानंतर जागावाटप पूर्ण होऊ शकते. पण, जागावाटपाचे सूत्र कसे असेल? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
लोकसभेतील 'स्ट्राइक रेट' आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर जागावाटप होईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे. निवडून येण्याची क्षमता हाच जागावाटपाचा मुख्य आधार असल्याचं भाजप नेते सांगत असताना मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde ) यांनी 'स्ट्राइक रेट'ची भर टाकली. त्यासह विधानसभा निवडणूक कधी होईल? याबद्दलही मुख्यमंत्री शिंदे यांनी संकेत दिले आहेत. ते वर्षा निवासस्थानी पत्रकारांनी अनौपचारिक चर्चा करत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटप लोकसभेतील 'स्ट्राइक रेट' आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर होईल. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि दोन टप्प्यांत होऊ शकते."
"राज्य सरकारनं घोषित केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसह अन्य योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार येईल, राज्य आर्थिक संकटात सापडेल हा विरोधकांचा खोडसाळ प्रचार आहे. आमच्या योजनांना नावे ठेवणारे विरोधक 'खटाखट' पैसे कुठून आणणार?" असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री अजून काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत 'स्ट्राइक रेट' चांगल्या असलेल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्यात किंवा मिळतील.
जिंकून येण्याची क्षमता हा निकष आम्ही विचारात घेत आहोत.
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरेल.
निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकते. मात्र, अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेणार.
विधानसभेला उमेदवार निवडताना महायुतीतील तीनही पक्षांच्या सर्वेक्षणांचा विचार करून जागा आणि उमेदवारी दिली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.