Majhi Ladki Bahin Yojana Sarkarnama
महाराष्ट्र

Majhi Ladki Bahin Yojana : 'ते' लाडके पुरूष अन् 'त्या' बहिणींकडून वसुली होणार; लाभार्थी पडताळणीवर फडणवीसांचं मोठं फर्मान

Devendra Fadnavis Orders Recovery from Male Beneficiaries of Majhi Ladki Bahin Yojana : माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.

Pradeep Pendhare

Maharashtra Cabinet meeting : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, घोटाळे करणारे कोण? असा सवाल केला जात आहे.

राज्यातील भाजप महायुती सरकारने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभामध्ये सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. या प्रकारावरून राज्य सरकारची कोटी रुपयांची लूट झाली आहे. अशा लाभार्थ्यांकडून वसुलीचं फर्मान अन् योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीचे काम सुरू ठेवण्याचं फर्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली. तसेच ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांची चौकशी करून पैसे वसूल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.

माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. या छाननीत तब्बल 26 लाख 34 हजार लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेतल्याने समोर आलं असून, त्यांचा लाभ थांबविण्यात आला आहे. यात काही पुरुषांनीही लाभ घेतल्याची गंभीर बाब समोर आली.

या पुरुष लाभार्थ्यांची चौकशी करा, त्यांच्या घरी विकलांग किंवा अन्य कारणांनी महिलांचे खाते नसेल आणि महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले का हेही तपासा. ज्या प्रकरणांत पुरुष दोषी असतील तर त्यांच्याकडून वसुली करा, असे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने सरकारच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती.

अपात्र लाडक्या लाभार्थी

यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26 लाख 34 हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज करूनही लाभ घेतला होता.

हप्ता वितरीत

या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26 लाख 34 हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2 कोटी 25 लाख पात्र ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा हप्ता वितरित केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पडताळणी

तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच या बोगस लाभार्थींविरोधात कारवाईऐवजी त्यांचा लाभ बंद करा. तसेच पुरुषांनी लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून वसुली करा असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

'या' लाडक्या अपात्र ठरणार

सरकारी नोकरदार, विविध योजनांच्या लाभार्थी आणि अन्य निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात यावा. तसेच त्यांची सातत्याने पडताळणी करण्यात यावी, ही प्रक्रिया थांबली नाही पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT