Shani Shingnapur Nitin Shete Death : 'शनैश्वर'च्या नितीन शेटे मृत्यूमागे वेगळच कारण? पोलिस अधीक्षक म्हणाले, 'बनावट अ‍ॅप प्रकरणात...'

Nevasa Shanishingnapur Nitin Shete Death Ahilyanagar SP Somnath Gharge Reacts : शनिशिंगापूर इथल्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे नितीन शेटे मृत्यू प्रकरणावर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रतिक्रिया दिली.
Somnath Gharge
Somnath GhargeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar SP Somnath Gharge statement : भ्रष्टाचाराच्या फेऱ्यात अडकलेल्या शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त तथा उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी गळफास घेऊन मृत्यूप्रकरणाने खळबळ उडाली आहे.

नितीन शेटे यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर न आल्याने, अन् सध्या देवस्थानच्या भ्रष्टाचाराचा, बनावट अ‍ॅप प्रकरणाचा, नोकर भरती प्रकरणाचा मुद्दा गाजत नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटलं आहे. यावर अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मोठा खुलासा केला.

शनिशिंगणापूर (Shanishingnapur) इथल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त आणि सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नितीन शेटे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याने मृत्यू झाला. आज सोमवारी सकाळी 8 वाजता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर एकच खळबळ उडाली.

दरम्यान, नितीन शेटे यांच्या मृत्यूप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन शेटे हे 2021 पासून शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये उप कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या देवस्थान भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी गाजत आहे. यातच देवस्थानच्या नावाने चालवले जाणाऱ्या बनावट ऑनलाईन अ‍ॅपचा मुद्दा तपाला असून, सायबर पोलिसांच्या फिर्यादीवरून शनिशिंगापूर पोलिस ठाण्यात गु्न्हा देखील आहे.

Somnath Gharge
Dhananjay Munde Beed caste conflict : 'संघर्षाला तयार! पण तो जातीपर्यंत, जिल्हा, आई-वडिल, मुला-बाळापर्यंत...'; धनंजय मुंडेंचा विरोधकांना सूचक इशारा

या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस करत आहेत. या प्रकरणात अनेक पदाधिकाऱ्यांचे आणि पुजाऱ्यांचे जबाब सायबर पोलिसांनी नोंदवले आहेत. मात्र, नितीन शेटे यांना या चौकशीसाठी कधीही पोलिसांनी बोलावले नव्हते किंवा त्यांना समन्सही बजावण्यात आले नव्हते, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

Somnath Gharge
NCP Vs Shivsena Politics : स्थानिक निवडणुकांपूर्वी तटकरेंचा मास्टर स्ट्रोक! गोगावले-थोरवेंच्या मतदारसंघातच उतरवले कट्टर विरोधक

नितीन शेटे यांच्यावर चौकशीचा सासेमिरा नव्हता, तर त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली, याबाबत सायबर पोलिस तपास करत आहे. खरंतर शेटे यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणाहून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहे, असे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com