Rahul Gandhi Sarkarnama
महाराष्ट्र

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? ; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार अन् 'FIR'चीही मागणी!

BJP complaint against Rahul Gandhi : जाणून घ्या, नेमकं कोणत्या प्रकरणात भाजपने राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

Mayur Ratnaparkhe

Maharashtra Assembly Elections: भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगास राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजपकडून सोमवारी करण्यात आलेल्या तक्रारीत मागणी करण्यात आली आहे की, राहुल गांधींना निवडणूक प्रचार करण्यापासून रोखलं जावं. भाजपने निवडणूक आयोगाकडे ही देखील मागणी केली आहे की, राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले जावेत.

राहुल गांधी(Rahul Gandhi) निवडणूक सभांमध्ये भाजपवर सरकारी नोकऱ्यांमध्ये एससी, एसटीच्या लोकांना आरक्षण न दिल्या गेल्याचा आरोप केला होता. राहुल गांधींनी म्हटले होते की, अनेक उद्योग आणि नोकऱ्यांमध्ये बघितलं तर तेथे एससी-एसटी समुदायाचे लोक दिसत नाहीत.अल्पसंख्याक समुदायाचे लोक दिसत नाहीत आणि गरीब परिस्थितीमधून येणाऱ्या लोकांनाही जागा मिळत नाही.

भाजपने आपल्या तक्रारीत राहुल गांधींच्या त्या वक्तव्याचाही उल्लेख केला, ज्यामध्ये राहुल गांधी यांनी म्हटले होते की जर तुम्हाल नोकरी मिळवायची असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं(RSS) सदस्यत्व घ्या, तर मग तुम्हाला कुठेही नोकरी मिळेल. तिथेही हेही बघितलं जाणार नाही की, तुमची योग्यता काय आहे किंवा मग तुम्हाला काय येत किंवा नाही येत.

याशिवाय निवडणूक आयोगाला केलेल्या तक्रारीत भाजपने राहुल गांधी(BJP) यांच्या अनेक उद्योगांना महाराष्ट्रातून गुजरातला नेलं जात असलेल्या वक्तव्यावरही कारवाईची मागणी केली आहे. खरंतर राहुल गांधींनी म्हटलं होतं, की ज्या कारखान्यांमध्ये तरुणांना रोजगार मिळाला पाहीजे होता, ते तुमच्याकडून काढून घेतले जात आहेत, तुमची जमीन आहे तुमच्याकडूनच हिसकावली जात आहे.

राहुल गांधींनी ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधत, सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला होता. राहुल गांधींच्या या विधानांचा उल्लेख करत तक्रारीत म्हटलं गेलं आहे की, राहुल गांधींनी त्यांच्या विधानात भाजप निवडणूक आयोगावर दबाव टाकला जात असल्याचे म्हटले आहे, तसेच ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा वापर करून सरकार पाडण्याचा आरोपही केला गेला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT