Pune Congress News: विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारा विरोधात बंडखोरी केलेल्या 26 जणांचे निलंबन काँग्रेसने केले आहे. या निलंबनाच्या यादीमध्ये पुण्यातील तीन काँग्रेस बंडखोरांचा समावेश आहे. यामध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बंडखोर उमेदवार आबा बागुल यांचा समावेश आहे. पक्षाकडून निलंबन करण्यात आल्यानंतर आबा बागुल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धती वर टीका केली आहे.
पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आबा बागुल (Aba Bagul) म्हणाले, 'काँग्रेसने राज्यातून 26 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेसकडून सर्वांना नोटीस दिली असल्याचे सांगण्यात आला आहे. मात्र आम्हाला कोणालाही नोटीस पोहचलेली नाही. आम्हाला नोटीस न देता कोणतही म्हणणं ऐकून न घेता कारवाई करण्यात आली आहे.'
तसेच 'मी कोणत्याही प्रकारची काँग्रेसशी (Congress) गद्दारी केलेली नाही. माझ्यापुढे कोणताही काँग्रेसचा उमेदवार नाही. काँग्रेसचे चिन्ह असलेल्या उमेदवाराविरोधात मी उभा नाही. तरीदेखील माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करताना काँग्रेसच्या घटनेनुसार आमचं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक होतं मात्र त्याची कोणती संधी आम्हाला देण्यात आली नाही. काँग्रेसकडून जी निलंबनाची यादी काढण्यात आली आहे.
सुरुवातीला फक्त 20 जणांची निलंबनाची यादी काढण्यात आली मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पुरवणी यादी म्हणून त्यांनी सहा जणांची यादी काढली नेमकं या मागचं गौडबांगाल काय आहे? हे कोणाच्या दबावाखाली करण्यात येत आहे?' असा सवाल बागुल यांनी उपस्थित केला.
याशिवाय 'काँग्रेस वाढवायचे वाचवायचे अशा वलग्ना करण्यात येतात. मात्र संधी देण्याची वेळ येते तेव्हा दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना संधी देण्यात येते निष्ठावंतांना कोणताही न्याय दिला जात नाही. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपर्क केला नाही. यांना काँग्रेस टिकवायची नसून त्यांना काँग्रेस संपवायची आहे. ते फक्त त्यांच्याच पदासाठी आणि हक्कासाठी भांडतात कार्यकर्ता संपला तरी चालेल.' अशी त्यांची भूमिका असल्याची टीकाही आबा बागुल यांनी केली.
याशिवाय 'काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना यापूर्वी आम्ही महाराष्ट्रात लक्ष घालण्याची विनंती केली होती. सध्या परिस्थितीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन सातत्याने बंदच असतो. कार्यकर्त्यांना त्यांच्याशी संपर्क होत नाही. यामुळे काँग्रेस रसातळाला जात असल्याची टीका आबा बागुल यांनी केली. तसंच मी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात लढत नसल्याने मी बंडखोरी केली नसून मी काँग्रेस वाचवण्यासाठी निवडणूक लढत असल्याचं बागुल यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीवेळी मला विधानसभेचे तिकीट येणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. तिकीट वाटपाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मला तुम्हालाच उमेदवारी मिळणार असं सांगण्यात आलं मात्र ऐनवेळी मला तिकीट नाकारण्यात आलं.' अस आबा बागुल म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.