Jayant Patil  Sarkarnama
महाराष्ट्र

Jayant Patil : भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा : जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Political News : भाजपच्या कुठल्याच नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाही.

Sachin Waghmare

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून माझ्या भाजप प्रवेशाबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. भाजपने मला कोणतीच ऑफर दिलेली नाही. भाजपच्या कुठल्याच नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाही. आठ दिवस झाले, की माझ्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत आहे. त्यामुळे मी येत्या काळात कुठेही जाणार नसल्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. लवकरच जागावाटपाची चर्चा पूर्ण होईल. त्यानंतर जागावाटप जाहीर केली जाईल. वंचित आघाडीसॊबत चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर (Praksah Ambedkar ) यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच जागावाटप पूर्ण होईल, असेही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

राजू शेट्टी (Raju shetty) यांच्यासोबत आमची चर्चा झालेली नाही. त्यासोबतच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा आघाडीच्या जागावाटपात अजून चर्चा झालेली नाही. ही जागा कोणाला सोडणार हे अजून ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शरद पवार गटाचा हा नेता जयंत पाटील असल्याची चर्चा देखील सुरु होती. मात्र जयंत पाटील यांनी याबाबत खुलासा करीत सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे. या सर्व अफवा असल्याचं स्वत: जयंत पाटील यांनी म्हटलं आहे

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, महविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षात आज अस्वस्थता आहे. या सर्वच पक्षातील मोठ्या नेत्यांच्या मनातही राजकीय भवितव्याबाबत अस्वस्थता आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने राजकीय योग्य पर्याय काय आहे तो शोधण्याचा प्रयत्न करत असतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.

SCROLL FOR NEXT