Political News : दक्षिणेत 5 कोटींच्या निधीवरून रंगली महाडिक-पाटील गटाची कुस्ती

Bjp News: लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीपूर्वी पाटीलविरुद्ध महाडिक या दोन गटांत मात्र चांगलीच कुस्ती रंगली आहे.
Satej Patil, Dhananjay Mahadik
Satej Patil, Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolahpur News: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणूक आणि पारंपरिक विरोधक म्हणून आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध माजी आमदार अमल महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांना पाहिले जाते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना या दोन गटांत मात्र चांगलीच कुस्ती रंगली आहे. पाच कोटींच्या निधीवरून श्रेयवाद घेण्यासाठी पोस्टरयुद्ध सुरू आहे.

राज्य सरकारकडून मूलभूत सोयीसुविधांमधून भाजपचे सहयोगी नेते यांच्या फंडातून महापालिकेला पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. आता याचं पाच कोटींतून महापालिका क्षेत्रात विविध विकासकामे होणार आहेत. मात्र, महाडिक आणि पाटील गटात हे श्रेय घेण्यावरून चांगलीच चढाओढ निर्माण झाली आहे.

Satej Patil, Dhananjay Mahadik
Tanaji Sawant News : दरी वाढली ? सावंतांची दांडी अन् गायकवाडांचा मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास

फुलेवाडी रिंगरोड, गंगाई लॉन आणि कळंबारोडवरून हे दोन्ही गटआमने-सामने आलेत. फुलेवाडी येथे याच फंडातून 50 लाखांचे गटाराचे काम केले जाणार आहे. मात्र, याचे पत्र महापालिकेला पाटील गटाच्या एका नेत्याने दिल्याचा दावा आहे, तर दुसरीकडे महाडिक गटाने विशेष प्रयत्नातून हा निधी आणल्याचे सांगितले जाते.

रिंगरोडवरील गजानन कॉलनी व गंगाई लॉन येथे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी एकाच कामाचे पोस्टर लावले आहेत. त्याची या भागात जोरदार चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या फंडातून हा निधी आल्याने त्यांनी या कामाच्या उदघाट्नासाठी यावे, अशी मागणी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. लोकांसमोर वस्तुस्थिती आणण्यासाठी महाडिक गटाचे प्रयत्न सुरू आहेत.

या निधीसाठी माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी पाठपुरावा केला. त्यातून दक्षिण मतदारसंघातील अनेक रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, हा निधी आपणच आणल्याचा कांगावा विरोधक करताहेत. जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक (Dhanjay Mahadik) यांनी व्यक्त केला आहे.

(Edited By: Sachin Waghmare)

R

Satej Patil, Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : 'मुन्नाची' बुलेट सवारी गेली 'बंटीच्या' बालेकिल्ल्यात

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com