Jayant Patil News : जयंतरावांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुळे म्हणाल्या, ‘दोनशे आमदार, तरीही आमचीच लोकं...’

Supriya Sule News : आमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे, म्हणूनच एवढी मोठी ताकद असतानाही आमच्यातले राहिलेले लोकदेखील त्यांना हवे आहेत.
Supriya sule-Jayant Patil
Supriya sule-Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजप प्रवेशाची चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चा सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जयंत पाटील जर भाजपचे विचार स्वीकारायला तयार असतील, तर त्यांना भाजप प्रवेश द्यायला काही हरकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (NCP Leader News)

पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. कांदा निर्यात बंदी जरी सरकारने उठवली असली तरी गेली अनेक महिने सरकारने कांदा निर्यात आणि इथेनॉलबाबतचे धोरण जाहीर केलेले नाही.

त्यामुळे सामान्य शेतकरी भरडला जात आहे. भारत हा कृषी प्रधान देश असताना देशाला फुल टाइम कृषिमंत्री नाही. त्यामुळे विविध पिकांबाबतचे धोरण सातत्याने बदलत असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. (Marathi Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya sule-Jayant Patil
Loksabha Election 2024 : शिर्डी सोडण्यास शिंदेंचा नकार; आठवले आता सोलापुरातून लोकसभा लढणार?

आम्ही रस्त्यावर उतरून कांदा निर्यातबंदीबद्दल केलेले आंदोलन आणि सातत्याने संसदेमध्ये केलेल्या भाषांमुळेच या लढ्याला यश आले असून, सरकारला त्यांचे धोरण बदलावं लागलं आहे, असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. (Supriya Sule)

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्या म्हणल्या, सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे, नागपूर आणि ठाणे या ठिकाणी क्राइम रेट वाढला आहे. त्यामुळे सातत्याने संबंधित खात्याचे मंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मी करत आहे. मात्र, आता केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून राज्यातील गृहमंत्रालयाचे ऑडिट करावे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

Supriya sule-Jayant Patil
Shivsena Maha Adhiveshan : एकनाथ शिंदे महाअधिवेशनातून वातावरणनिर्मिती करण्यात यशस्वी; पण 'हे' चॅलेंज कसे पेलणार?

जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेली काही दिवसांपासून अनेक जण भाजपमध्ये जाणार अशा चर्चा आहेत, माझ्याबद्दल रोहित पवारांबद्दल जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांच्याबद्दल रोज चर्चा असते, यातून हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्याकडे 200 आमदार, 300 खासदार असतानाही आमच्या लोकांची गरज त्यांना पडत आहे. आमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे, म्हणूनच एवढी मोठी ताकद असतानाही आमच्यातले राहिलेले लोकदेखील त्यांना हवे आहेत.

पक्ष फोडले, घरे फोडली, तपास यंत्रणांचा वापर केला, तरीदेखील भाजपला त्यांच्या विजयाचा विश्वास नाही. त्यामुळे ते आमच्यातील लोकांना त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचीही भेट घेत आहेत, यातूनच महाराष्ट्राचे चित्र काय आहे, हे दिसत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

(Edited By : Vijay Dudhale)

R

Supriya sule-Jayant Patil
MP Sujay Vikhe : दोघेही महायुतीचे तरीही...; नीलेश लंके आयोजित कार्यक्रमावरून विखे म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com