Raj Thackeray_Uddhav Thackeray Alliance 
महाराष्ट्र

Bawankule on Raj Thackeray: शिवसेना-मनसे युतीबाबत राज ठाकरेंच्या संकेतांवर भाजपची पहिली प्रतिक्रिया; बावनकुळे म्हणतात, आम्ही निवडणुका...

Bawankule on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अर्थात मनसेचा मुंबईत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत.

Amit Ujagare

Bawankule on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अर्थात मनसेचा मुंबईत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी त्या दिशेनं पावलं टाकण्याचे आदेशच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

मध्यंतरी त्यांनी दुबेंना संसदेत जाब विचारणाऱ्या काँग्रेसच्या महिला खासदारांचं कौतुक केलं होतं. त्यामुळं राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी तयार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपनं यावर पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केलं आहे.

राज ठाकरे युतीबाबतच विधान?

मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटासोबतच्या संभाव्य युतीबद्दलही भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, “ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काय करायचं ते माझ्यावर सोडा. मी युतीबाबत योग्यवेळी बोलेन, माझ्या आदेशाची वाट पाहा. तसंच यंदा मनसे १०० टक्के महापालिका निवडणुकीत सत्तेवर येणार आहे. त्यामुळं मतदार यादीवर विशेष काम करा, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. मुंबई महापालिकेत आपलीच सत्ता येणार असल्यानं आतापासूनच कामाला लागा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. कार्यकर्त्यांनी हेवेदावे न करता काम करावं, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

भाजपची प्रतिक्रिया

दरम्यान, राज ठाकरेंनी दिलेल्या शिवसेनेसोबतच्या युतीच्या भाष्यावर चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "मी आधीही सांगितलं होतं की राज ठाकरेंना कोणासोबत जायचं? उद्धव ठाकरेंना कोणासोबत जायचं? शरद पवारांना कोणासोबत जायचं हे त्यांचं त्यांना ठरवू द्या. आमचं ठरलं आहे, आमची महायुती ठरली आहे. आमच्या महायुतीत आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि ५१ टक्क्यांनी तर आम्ही लढाई जिंकणार आहोत"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT