Vikhe Patil : 'ना माझ्यावर कुणाचा संशय, ना माझा कुणावर.. हनीट्रॅप प्रकरणावर विखे पाटलांचं खळबळजनक विधान !

Radhakrishna Vikhe Patil on Honey Trap : नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केलं. हनीट्रॅप प्रकरणाची चौकशी कोणीही थांबवलेली नाही, चौकशी होणारच असल्याचे ते म्हणाले.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Honey Trap Nashik : नाशिकमधील हनीट्रॅप प्रकरणाची चौकशी कोणीही थांबवलेली नाही. हनी ट्रॅप प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वत: त्यामध्ये लक्ष आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहीजे. या प्रकरणात आजी-माजी मंत्री किंवा कोणीही असो, त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली.

नाशिक येथे उल्हास वैतरणा कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी जलसंपदा मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य करताना नाशिकमधील हनीट्रॅप प्रकरणावरही भाष्य केलं.

नाशिकमधील हनीट्रॅप प्रकरणात राज्यातील ७२ अधिकारी व आजी-माजी मंत्री अडकल्याचे कथित प्रकरण बाहेर आल्यानंतर राज्यभरात त्याची चर्चा झाली. विरोधकांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. परंतु याप्रकरणावर अधिकृतपणे तक्रार नसल्याने हनीट्रॅपच्या जाळ्यात नक्की कोण अडकले त्यांची नावे समोर आलेली नाही. यामध्ये राजकीय नेते व शासकीय अधिकारीच नव्हे तर वैद्यकीय वा अन्य श्रेत्रातीलही काहीजण अडकल्याचे बोलले जात आहे. यातील काहींना त्याची किंमत मोजावी लागल्याची देखील चर्चा आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावर आनंद मावेना, १० वर्ष राजकारणापासून दूर राहिलेला तो नेता भाजपात दाखल

विधिमंडळात पावसाळी अधिवेशादरम्यान हनीट्रॅप प्रकरणातील हॉटेल हे कॉंग्रेसच्या नेत्याचे असल्याचा उल्लेख झाला होता. मात्र या प्रकरणावर बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना हनी आहे ना ट्रॅप असं स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकला. परंतु तरीही या प्रकरणावरुन विरोधकांनी सवाल उपस्थित केले. नाशिककर हनीट्रॅप प्रकरणातील अधिकारी व नेत्यांची नावे ऐकण्यास उत्सुक आहेत असे फलक शहरात झळकले. सुरुवातीला नाशिक, ठाणे त्यानंतर जळगावचे नावही या प्रकरणात जोडले गेले. जळगावात प्रफुल्ल लोढाला हनीट्रॅप प्रकरणात अटक झाली. दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्यीने नाशिकमधील हे हॉटेल आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा संबंध काय?असा खळबळजनक सवाल उपस्थित केला.

Radhakrishna Vikhe Patil
Chhagan Bhujbal : चुकीचं बोलणाऱ्या नेत्यांकडे लक्ष द्या, छगन भुजबळांचा सल्ला कुणाला?

हनीट्रॅप प्रकरणावर बोलताना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी कुणीही थांबवली नसल्याचे स्पष्ट केलं. या प्रकरणाची सत्यता बाहेर यायला हवी. जेणेकरुन एकमेकांविषयी संशय राहता कामा नये असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच अशाच प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचे मात्र विखे-पाटील यांनी नाकारले. कोणताही नवीन प्रश्न आला तर, एखादा प्रश्न मागे राहत नाही, चौकशी सुरूच राहते असं विखे पाटलांनी म्हटलं आहे. हनीट्रॅप प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. माझा कुणावर संशय नाही आणि माझ्यावरही कुणाचा संशय नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com