Devendra Fadnavis-Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Video : फडणवीसांच्या संकटमोचकाचे मोठे विधान, म्हणाले 'छगन भुजबळ यांची नाराजी परवडणार नाही'

Chhagan Bhujbal loath Girish Mahajan : भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार, महायुतीमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा आहेत. भुजबळांच्या नाराजीबाबत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Roshan More

Chhagan Bhujbal News : मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. राज्यात आपण दौरा करणार असून ओबीसींचा एल्गार करणार आहे, असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार, महायुतीमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा आहेत. भुजबळांच्या नाराजीबाबत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

गिरीश महाजन म्हणाले, 'भुजबळसाहेब हे ओबीसींचे मोठे नेते आहेत. ओबीसींचा मोठा चेहरा म्हणजे भुजबळसाहेब, याबाबत कोणाचे दुमत नाही. ते जुने आणि मोठे नेते आहेत. त्यांची नाराजी आम्हाला परवडणार नाही, हे खरं आहे. मी नाशिकला जाणार आहे तेव्हा मी त्यांची भेट घेणार आहे.'

'भुजबळसाहेब महायुती सोडणार नाही. महायुती त्यांनी सोडणे आम्हाला परवडणारे नाही. ओबीसींचा मोठा चेहरा ते आहेत हे सर्वांना मान्य आहे. आम्ही प्रयत्न करू ते आम्हाला सोडून जाणार नाही.तसेच मला खात्री आहे ते आम्हाला सोडून जाणार नाही.', असे देखील महाजन म्हणाले.

खातेवाटप दोन दिवसांत

मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी अजूनही मंत्रिपदांचे वाटप झालेले नाही. त्यामुळे कोणाला कोणते खाते मिळणार याची उत्सुकता आहे. खाते वाटपाबाबत बोलताना महाजन म्हणाले, दोन तीन दिवसांमध्ये खाते वाटप होईल. अधिवेशन संपण्याच्या आधी खाते वाटप होणार आहे.

मंत्रिपदाची हाव नाही

छगन भुजबळ हे नागपूरच्या अधिवेशनाकडे फिरकले नाही. आज त्यांनी नाशिकमध्ये समता परिषदेच्या मेळाव्याला संबोधित केले. त्यावेळ अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच मंत्रिपदाची हाव मला नाही. मंत्रिपदाची हाव जर मला असली असती तर 17 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला नसता. मराठा समाजाच्या आरक्षणाला मी कधीच विरोध केला नाही, असे भुजबळ म्हणाले.

भुजबळांच्या नाराजीचे कारण वेगळेच

अजित पवार यांचे नाव न घेता छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीमधील आपल्याच सहकाऱ्यांवर हल्लाबोल केला. तसेच आपल्या नाराजीचे कारण उघड करताना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून आपण नाराज नाही तर पक्षातील लोकांकडून जी वागणूक मिळाली त्यामुळे आपण नाराज असल्याचे म्हटले. दरम्यान, भुजबळ यांना मंत्रिपद मिळावे म्हणून ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांच्याकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT