Eknath Shinde : शिंदेंच्या आणखी एका शिलेदाराने टाकला बॉम्ब; म्हणाले,'मी नाराज झालोय तरी...'

Eknath Shinde Shivsena : मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. आता शिंदेंच्या आणखी एका शिलेदाराने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर महायुतीमधील पक्षांमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज झाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर तानाजी सावंत यांच्यासह अनेक जण नाराज झालेत.

कोल्हापुरातून महाविकास आघाडीच्या काळात राज्यमंत्री असलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांची नाराजी देखील उघड झाली आहे. मात्र नाराज असलो तरी पाच वर्षे महायुती सोबतच राहणार असल्याचे यड्रावकर यांनी स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळी मी माझं राज्यमंत्रीपद सोडून त्यांच्यासोबत गेलो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या विद्यमान मंत्र्यांना मी वगळता सर्वांना मंत्रिपद मिळाले. त्यामुळे किमान यावेळी तर मला मंत्रिपद मिळेल अशी माझी अपेक्षा होती. मात्र मंत्रीपद मिळालं नसल्यामुळे निराशा झाली. मी नाराज झालोय. अशा शब्दात शिवसेनेचे घटक पक्ष असलेल्या राजर्षी शाहू आघाडीचे नेते आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde
Chhagan Bhujbal : 'पुन्हा लढू, हा लढा मंत्रिपदाचा नाही, तर अस्मितेचा...'; छगन भुजबळांचा सूचक इशारा

मंत्रीपद न देण्यामागे नेत्यांच्या काही अडचणी असाव्यात. किंवा छोट्या मित्र पक्षांना मंत्रिपद देणे गरजेचे वाटलं नसावं. अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल किंवा मंत्रीपद बदलली जातील याबद्दल शंका आहे. त्यामुळे येणाऱ्या अडीच वर्षाबाबत मला माहिती नाही, मात्र मी आशावादी आहे. ज्यांच्या सोबत जातो तिथे प्रामाणिक राहतो ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळाल नसल्यामुळे मी नाराज असलो तरी पाच वर्षे महायुती सोबतच राहणार असल्याचे यड्रावकर यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde
MP Varsha Gaikwad : 'तरी बाबासाहेब नेहमीच "फॅशन"मध्ये राहतील'; खासदार गायकवाडांचा अमित शाह यांना इशारा

मी नाराज आहे. मात्र पाच वर्ष महायुती सोबतच राहणार आहे. मला काही अडचणी आल्या असाव्यात म्हणून मला मंत्रीपद नाकारलं असेल. अडीच वर्ष मंत्रिपदाच्या फॉर्मुल्याबाबत मला माहिती नाही. मात्र राजकारणात अशा आश्वासनांना गांभीर्याने घ्यायचं नसतं. ग्रामपंचायत नगरपंचायतीमध्ये अशीच प्रतिज्ञापत्रे लिहून घेतो नंतर त्याचं काय होतं ते आम्हाला माहिती आहे. असेही यड्रावकर यांनी स्पष्ट केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com