Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar News: '' सत्तेत असताना राज्य कर्जात बुडवायचं आणि...''; 'या' नेत्याचा अजित पवारांना खोचक टोला

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्यातील विविध मुद्द्यांवरुन केंद्र आणि राज्य सरकारवर सातत्यानं ताशेरे ओढत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. अजित पवार असो किंवा कुणीही असो सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही. सरकार बदललं तेव्हा आम्हीही कुणाची कामं बंद केली नाहीत असंही अजित पवार म्हणाले होते. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेची मस्ती आणि नशा डोक्यात जाऊ देऊ नये असा टोलाही लगावला होता. पवार यांच्या टीकेला सत्ताधारी भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे.

भाजप नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी नोटबंदीचे समर्थन करताना अजित पवारांवर निशाणा साधला आहे. मुनगंटीवार म्हणाले, रिझर्व्ह बँक भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करूनच असा निर्णय घेत असते.आज देशाची अर्थव्यवस्था ही पाश्चात्य देशांच्या अर्थव्यवस्थेबरोबर येत चालली आहे. तसेच भारताची आर्थिक प्रगती ही आता प्रगतशील देशाबरोबरच सुरु आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. विदेशातसुद्धा काही दिवसानंतर चलन बदलले जातात.

विरोधकांवर टीका करताना म्हणाले, एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खासदार लोकसभेमध्ये मागणी करतात की 2000 च्या नोटा बंद करावी. तर दुसरीकडे म्हणतात या नोटा बाजारामध्ये दिसत नाही. म्हणजेच ज्या नोटा दिसत नाही, चलनामध्ये नाही, ज्या चलनातील अशा नोटा रिझर्व्ह बँक बंद करत असेल तर त्यामध्ये काय नवीन अशी टीका केली. तसेच राज्यात सत्तेत असताना राज्य कर्जात बुडवायचं आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास करता अमेरिका आणि चीन अर्थव्यवस्थेपेक्षा आपल्या देशाचा विकासदर जास्त आहे. आज सर्वात जास्त २ हजारच्या नोटा कुणाकडे आहेत असा टोलाही खोचक टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.

'' अजित पवार ज्या मस्तीने वागत होते..''

खासदार प्रतापराव जाधव यांनी अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीवरही सडकून टीका केली आहे. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीचं सरकार वागत होतं. मात्र तसं शिंदे-फडणवीस सरकार वागत नाही अशी खोचक टीकाही पवार यांच्यावर केली आहे. तसेच सत्तेत असताना अजित पवार ज्या मस्तीने वागत होते, त्याच्या 10 टक्केही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वागत नाहीत असे खडेबोलही सुनावले आहेत.

शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव(Prataprao Jadhav) यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, संजय राऊत यांना तुरुंगातील दिवसावर वेगळं असं पुस्तक लिहिण्याची गरजच नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी त्यांना सामना हे वृत्तपत्र काहीही लिहिण्यासाठी खुलं करून दिलं असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

पवार नेमकं काय म्हणाले होते..?

मागे एकदा सरकारने सांगितलं की ५०० आणि हजाराची नोट बंद. काल फतवा काढला की, दोन हजारांची नोट बंद. याला काय अर्थ राहिला आहे का? आता दोन हजारांच्या नोटा द्या आणि बदलून घ्या. आपल्या देशाने इंदिरा गांधीचा काळ पाहिला, वाजपेयींचा काळ पाहिला, मोदींच्या आधी मनमोहन सिंह पंतप्रधान होते आपण तो काळही पाहिला.

काही निर्णय राज्यकर्ते म्हणून घ्यावे लागतात. नकली नोटा, बनावट नोटा, बाहेरच्या लोकांनी चलन अडचणीत आणायचा प्रयत्न केला, बदल करावे लागतात याबद्दल दुमत नाही. पण हे सारखं सारखं का करावं लागतंय? याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे असं म्हणत अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

यावेळी त्यांनी मविआ(Mahavikas Aaghadi) च्या काळात ज्या कामांना स्थगिती दिली होती ती अद्याप उठवलेली नाही. काय कारण आहे? ही काय आमची घरची कामं नव्हती. सत्ता बदलत असते, कुणी कायमचं त्या खुर्चीवर बसत नसतं. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता दाखवून देईल. कर्नाटकात कसं दाखवून दिलं? असं अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारला सुनावलं होतं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT