Dr. Avinash Warjukar  Sarkarnama
महाराष्ट्र

BJP leader : भाजप नेत्याला बलात्काराच्या आरोपातून 'क्लीन चिट'! नेमकं प्रकरण काय?

BJP leader cleared of rape charges case explanation : बलात्काराच्या आरोपांप्रकरणी भाजप नेत्याला तपासानंतर क्लीन चिट मिळाली. संपूर्ण प्रकरण, घडामोडी आणि महत्वाचे तपशील जाणून घ्या.

Rashmi Mane

BJP leader : भाजप नेत्याला बलात्काराच्या आरोपातून ‘क्लीन चिट’ मिळाल्याने भंडारा जिल्ह्यातील एक जुने प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. तब्बल 9 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या या प्रकरणाचा निकाल 17 एप्रिल रोजी लागला असून न्यायालयाने माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर आणि त्यांचे वाहन चालक आशिष नागदेवे यांना निर्दोष मुक्त केले आहे.

ही घटना 9 नोव्हेंबर 2015 ची असल्याचे सांगितले जाते. 9 नोव्हेंबरच्या दिवशी एका महिलेने भंडारा शहरातील हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार करून धमकावल्याचा आरोप डॉ. वारजूकर यांच्यावर केला होता. या आरोपानंतर भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू झाला. प्रकरण गंभीर असल्याने याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले गेले होते.

मात्र, न्यायालयात सुनावणीदरम्यान सादर झालेल्या पुराव्यांमधून वेगळीच बाब समोर आली. संबंधित महिला आणि तिचा मित्र कैलास गोलछा हे दोघे त्या दिवशी एका हॉटेलमध्ये एकाच खोलीत थांबले होते, अशी माहिती समोर आली. हॉटेलमधील कर्मचाऱ्याने दिलेल्या साक्षीनुसार, त्या रात्री दोघांनी एकत्र जेवण केले आणि मद्यपानही केले होते.

तसेच, डॉ. वारजूकर यांचे त्या महिलेच्या कुटुंबाशी आधीपासूनच कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे त्यांनी ही बाब तिच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर स्वतःबद्दलची माहिती उघड होईल या भीतीने संबंधित महिलेने कट रचून खोटी तक्रार दाखल केली, असा दावा बचाव पक्षाने केला होता.

न्यायालयाने या प्रकरणातील सर्व साक्षी आणि पुरावे बारकाईने तपासले. त्यामध्ये तक्रारीतील अनेक विसंगती स्पष्टपणे आढळून आल्या. महिलेच्या जबाबात आणि साक्षींमध्ये सातत्य नसल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे न्यायालयाने ही तक्रार विश्वासार्ह नसल्याचे नमूद केले.

या सर्व बाबींचा विचार करून न्यायाधीश भारती काळे यांनी डॉ. अविनाश वारजूकर आणि आशिष नागदेवे या दोघांनाही सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले. या निकालानंतर त्यांच्या कुटुंबीय आणि समर्थकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून, सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT