Vidhan Parishad Candidate : विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची नावे फिक्स! 'या' 12 जणांमधून होणार निवड? यादी आली समोर!

BJP Vidhan Parishad Candidate : राज्यातील विधान परिषदेतील 10 पैकी 6 जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. त्यामुळे या जागेवर आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेक दिग्गजांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र भाजपचा आजपर्यंतचा इतिहास बघता ते उमेदवरी देताना काही धक्कातंत्रांचा देखील वापर करू शकतात.
BJP leaders gather at Varsha residence to discuss Vidhan Parishad candidate selection and election strategy in Maharashtra.
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

BJP Vidhan Parishad candidate : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची आज रात्री वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत विधान परिषदेची उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचं खलबतं होण्याची शक्यता आहे.

या बैठकीतील चर्चेनंतर काही नावांचा प्रस्ताव भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाऊ शकतो. त्यामुळे आता या यादीत नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

राज्यातील विधान परिषदेतील 10 पैकी 6 जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. त्यामुळे या जागेवर आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेक दिग्गजांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र भाजपचा आजपर्यंतचा इतिहास बघता ते उमेदवरी देताना काही धक्कातंत्रांचा देखील वापर करू शकतात.

BJP leaders gather at Varsha residence to discuss Vidhan Parishad candidate selection and election strategy in Maharashtra.
Baramati By Election : सुनेत्रा पवारांनी टायमिंग साधलं! फडणवीस स्टेजवर असतानाच बारामतीकरांसमोर अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केली मोठी शंका

एकीकडे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जवळपास फिक्स झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता इतर पाच जागांवर उमेदवारी देताना भाजपकडून मागील काही निवडणुकांमधून आलेला अनुभव, तसंच जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा विचार होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, भाजपमधील इच्छुकांनी विधान परिषदेसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात सध्या प्रज्ञा सातव, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, माधवी नाईक, राजेश पांडे, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी आणि संजय काका पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

BJP leaders gather at Varsha residence to discuss Vidhan Parishad candidate selection and election strategy in Maharashtra.
पुणे-मुंबई प्रवास ३० मिनिटांनी कमी होणार! १ मे पासून 'मिसिंग लिंक' होणार खुली

त्यामुळे आता या 12 जणांपैकी नेमकं कोणाच्या गळ्यात विधान परिषदेची उमेदवारी पडणार हे आजच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com