Nitesh Rane And Aaditya Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Nitesh Rane : 'गोऱ्या गोमटा चेहऱ्यामागे कोण मोठा बलात्कारी', राजीनामा द्या; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका

Nitesh Rane demand Aaditya Thackeray Resignation On Disha Salian case : पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंवर आरोप केल्याने आता नवा वाद सुरू झाला आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. तसेच याच याचिकेतून आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली आणि दिनो मोर्या आणि पोलिसांवर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढण्याची शक्यता असून भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी यावरून जोरदार टीका केली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीचा राजीनामा मागताना, 'ही तर सुरूवात असून अभी पिक्चर बाकी है', असा हल्लाबोल केला आहे.

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याने आता फाईल पुन्हा ओपन होण्याची शक्यता आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी या याचिकेतून दिशाचा सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे. कुटुंबावर ठाकरे गटाच्या नेत्या तथा मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई पोलीसांनी दबाव टाकल्यावा दवा केला आहे. तर आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोर्या यांचे नाव घेत गंभीर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यामुळे आता राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचपार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर तोफ डागली आहे.

नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आपण आधीपासूनच सत्य मांडत होतो. जे आता समोर आले आहे. याप्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्यच होते. आतातर दिशाच्या वडिलांनीच या प्रकरणी दावा केलायय त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीय.

तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणून हे प्रकरण दाबण्यात आल्याचा दावा करताना, तुम्ही जास्त वेळ खोटं लपवू शकत नाही. फक्त वडील मुख्यमंत्री होते म्हणून तुम्ही राज्यभर बलात्कार करणार आहात का? महिलांवर अत्याचार करत बसाल, कुठल्या तोंडाने या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय? असे सवाल करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तर लोकप्रतिनिधीवर जर असे गंभीर आरोप होत असतील तर त्याने तत्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. मगच होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी, असेही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

यावेळी नितेश राणे यांनी दिशा एक साधी आणि सामान्य मुलगी होती. जी आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी येथे आली होती. पण या लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन हत्या केलीय, असा आरोप आता तिचे वडील करतायत. त्यामुळे जे काही सत्य असेल ते आदित्य ठाकरे यांनी सांगावं, असेही आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.

तर उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जे काही केलं ते मी वारंवारं सांगत आलो आहे. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे गायब केले, मस्टरची पाने फाडली, वॉचमेनला गायब केलं. त्या झोमॅटो डिलिवरी बॉय कुठे गेला याबाबत अनेकदा बोललो आहे. पण आता खरे सत्य बाहेर येईल. या गोऱ्या गोमटा चेहऱ्यामागे मोठा बलात्कारी लपला आहे, जे जनतेच्या समोर येईल. पण हा विषय येथेच थांबणार नाही. तर लहान मुलांचा या प्रकणात काय रोल होता. हे देखील उघड होणार आहे. 'ही तर फक्त सुरुवात आहे, पिक्चर बाकी है", इशारा नितेश राणे यांनी यावेळी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT