Nitesh Rane : तंबी वगैरे सब झूठ... राणेंकडून फडणवीसांसाठी 'मच्छीचा' फक्कड बेत; स्पेशल पत्रिकाही दिली

Nitesh Rane : नितेश राणे यांनी गुरुवारी महायुतीच्या सर्व मंत्री आणि आमदारांसाठी विशेष जेवणाचे आयोजन केले आहे. याच आयोजनाची पहिली पत्रिकाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली.
Devendra Fadnavis - Nitesh Rane
Devendra Fadnavis - Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : नागपूर दंगलीनंतर राज्यातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. औरंगजेबाची कबर हटविण्यावरून झालेल्या वादातून ही दंगल उसळली होती. या दंगलीचे पडसाद राज्याच्या विधानसभेपर्यंतही पोहचले. विरोधकांनी या घटनेला महायुती सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच या घटनेला मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची वक्तव्य कारणीभूत असून त्यांना कोणाची सूट आहे, कोणाचे बळ आहे असा सवाल केला.

यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना तंबी करत वादग्रस्त वक्तव्यावरून दम भरल्याची चर्चा सुरू आहे. फडणवीस यांनी नितेश राणे यांना विधानभवनतील आपल्या कॅबिनमध्ये बोलवत चांगला दम भरला. त्यांनी राणे यांना काही दिवस शांत राहण्यास सांगितले असल्याची चर्चा समोर आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार ही भेट दम देण्यासोबतच चिडलेल्या फडणवीस यांना शांत करण्यासाठीही होती, अशी माहिती समोर येत आहे.

Devendra Fadnavis - Nitesh Rane
Nagpur Violence : संतापजनक! नागपूर हिंसाचारात महिला पोलिसाचा विनयभंग? शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी अन् वर्दीवर हातही टाकला

नितेश राणे यांनी गुरुवारी महायुतीच्या सर्व मंत्री आणि आमदारांसाठी विशेष जेवणाचे आयोजन केले आहे. याच आयोजनाची पहिली पत्रिकाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली. स्वतः राणेंनी दिलेल्या माहितीनुसार, ही पत्रिका देण्यासाठी ते फडणवीसांच्या केबिनमध्ये गेले होते. पत्रिकाही अगदी स्पेशल होती. मत्स्य व्यवसाय मंत्री असल्याने माश्याच्या आकाराची पत्रिकाच राणे यांनी छापली आहे. या स्पेशल जेवणावळीत फडणवीस यांना खास कोकणी मच्छीचा बेत असणार आहे. पण फडणवीस मच्छी खातात की नाही? याची माहिती मिळू शकलेली नाही.

मी फडणवीस यांचा लाडका मंत्री :

तंबी दिल्याच्या प्रश्नावर राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या यादीतील आपण आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडक्या मंत्र्यांची यादी आहे. या यादीतील मी एक लाडका मंत्री आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मला काय बोलले याची कोणाला चिंता करण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी तंबी दिल्याच्या बातम्यांचे खंडन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com