Nagpur News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपकडून आतापासूनच प्रचाराची रणनीती आखली जात आहे. गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात असल्याने भाजपने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी आता या चार बड्या नेत्यांवर सोपवली आहे. नागपुरमध्ये पार पडलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात महिनाभर प्रचाराची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर असणार आहे. राज्यभरात तेच प्रचार सभा घेणार आहेत. त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील महाराष्ट्र पिंजून काढण्याची जबाबदारी येत्या काळात असणार आहे. (Bjp News)
नुकत्याच राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला निवडणुकीत मोठा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपने (Bjp) रणनीती बदलली असल्याचे समजते.
भाजपने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. येत्या आठवड्याभरात 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार आहेत. तर अशोक चव्हाण, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे.
नितीन गडकरी असणार विशेष प्रचारक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विशेष प्रचारक म्हणून एक महिना संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार असल्याचेही बोलले जात आहे. निवडणूक काळात प्रचाराची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. राज्यभर ते प्रचार सभा घेत संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी राज्यात भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची 30 जागांवर सरशी झाली. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले असल्याचेही बघायला मिळाले आहे. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर कदाचित महायुतीची सत्ता जाणे अटळ असल्याची शक्यता आहे.
दुसरीकडे विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भासह राज्यातील सर्व जागांवर भाजपकडून विशेष मंथन करण्यात येत असून त्या अनुषंगाने भाजपकडून तयारी केली जात असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.