Girish Mahajan Politics: महाजनांकडून खडसेंचे वस्त्रहरण, म्हणाले, कन्येच्या प्रचारासाठी करताहेत बहाणेबाजी!

Girish Mahajan on Eknath Khadse: ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांचे राजकारण संधीसाधू.
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Mahajan Vs Khadse: एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद थांबण्याचे चिन्हे नाहीत. श्री. खडसे यांच्या आरोपाला महाजन यांनी उत्तर दिले आहे. या उत्तरामुळे खडसे यांचे अक्षरशः वस्त्रहरण झाले आहे.

ग्रामविकास मंत्री महाजन आणि एकनाथ खडसे यांचे सख्य सर्वश्रुत आहे. खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्री महाजन यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्याला तेवढ्याच वेगाने महाजन यांनी देखील उत्तर दिले आहे.

मंत्री महाजन यांच्या उत्तराने श्री. खडसे यांचे अक्षरश: वस्त्रहरण होण्याची चिन्हे आहेत. श्री खडसे यांनी उपस्थित केलेले प्रश्न किती निरर्थक आहेत, हे महाजन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाजन यांच्या प्रतिउत्तराला खडसे काय उत्तर देतात, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

श्री महाजन म्हणाले, खडसे हे दिल्लीला गेले होते. दिल्लीत त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांचा प्रचार केल्याचा दावा केला. राज्यमंत्री खडसे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

Eknath Khadse & Girish Mahajan
Sujay Vikhe : 'दारुड्या स्टेटस ठेवतो अन् गाव बंद होतं'; सुजय विखे, असं का म्हणाले?

जर श्री खडसे यांना पक्षाच्या अध्यक्षांनीच प्रवेश दिला असेल, तर त्याला विरोध करण्याची हिम्मत कोणी करू शकेल का? निदान माझी तरी तेवढी हिंमत नाही. खडसे हे सतत रडीचा डाव खेळत असतात. बहाणेबाजी करतात. आताही त्यांनी तसेच केले आहे.

श्री खडसे यांनी आताही असाच काहीसा प्रकार केलेला आहे. मात्र त्यांच्या या थापांना कोणीही भूलणार नाही. कारण सगळे लोक खडसे यांना व त्यांच्या राजकारणाला ओळखतात.

श्री खडसे म्हणतात, मी अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांनी माझा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी मला विरोध करण्याचे थांबविले नाही तर मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होईल, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.

Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse News : 'भाजपमध्ये नड्डांपेक्षा फडणवीस अन् महाजन मोठे नेते...'; खडसे असं का म्हणाले?

श्री. खडसे यांच्या या विधानावर लहान मुलगा तरी विश्वास ठेवू शकतो का? एकाच वेळी एक व्यक्ती दोन पक्षात कशी असू शकते? श्री खडसे यांना आता संधीसाधू राजकारणाचा नवा डाव टाकायचा आहे, असे मंत्री महाजन म्हणाले.

आपल्या कन्येसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवायची आहे. तिचा निवडणुकीत प्रचार करायचा आहे. म्हणून ते भारतीय जनता पक्षावर आणि पक्षाच्या नेत्यांवर अशाप्रकारे आरोप करीत सुटले आहेत, असा दावा मंत्री महाजन यांनी केला.

श्री खडसे यांचे राजकारण केवळ संधीसाधू असते. त्यांना आपले स्वतःचे हित साधायचे असते. पक्ष आणि कार्यकर्त्यांना त्यांनी कधीच महत्त्व दिलेले नाही, असा आरोप मंत्री महाजन यांनी केला.

श्री खडसे यांच्या आरोपांना श्री महाजन यांनी दिलेल्या उत्तराने खडसे यांचे मुद्दे खोडल्याचा दावा केला जातो. आता श्री खडसे भाजपमध्ये राहणार की, सोयीच्या राजकारणासाठी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे यु टर्न घेणार हा जळगावच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com