Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

New CM Devendra Fadnavis : देवाभाऊ... विधान भवनात एकच गजर! आमदार, नेत्यांचा आनंद गगनात मावेना...

BJP Core Committee Meeting Live Update: भाजपच्या आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.

Rajanand More

Mumbai News: भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी अखेर गुरूवारी देवेंद्र फडणवीस यांच्य नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. विधान भवनात झालेल्या आमदारांच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव येताच आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत, बाके वाजवून आपला आनंद व्यक्त केला.

विजय रुपानी यांनी गटनेता निवडीच्या प्रक्रियेला सुरूवात केली. सर्व आमदारांच्या इच्छेनुसार आपण विधिमंडळ गटनेत्याची निवड करू. आपल्यापैकी कुणीही प्रस्ताव देऊ शकतात. त्यांनी प्रस्ताव ठेवावा. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर आमदारांकडून फडणवीसांच्या नावाची घोषणाबाजी झाली. देवाभाऊचा गजर विधान भवनात झाला.

सर्व आमदारांनी त्याचे बाके वाजवून स्वागत केले. त्यानंतर मुनगंटीवार यांनीही फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पंकडा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय सावकारे, मेघना बोर्डीकर, गोपीचंद पडळकर, आशिष शेलार, व संजय कुटे यांनी अनुमोदन दिले.  त्यानंतर रुपानी यांनी सर्वसंमतीने विधिमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसांच्या नावाची घोषणा केली.

दरम्यान, कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याने तेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरूवारी शपथविधी सोहळ्यात फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपमुख्यंमत्री म्हणून शपथ घेतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT