Minister Atul Save News Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
महाराष्ट्र

Atul Save : मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक; ताब्यात घेतलेला तरुण मनोरुग्ण!

Stone Attack On Minister Atul Saves Car : कमी पैसे दिले म्हणून संतापलेल्या गणेशने शेजारी पडलेला दगड उचलला आणि तो सावे यांच्या उभ्या असलेल्या गाडीच्या समोरच्या बाजूच्या काचेवर मारला.

Jagdish Pansare

  1. छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या कारवर अज्ञात युवकाने दगडफेक केली.

  2. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी तरुणाला ताब्यात घेतले असून तो मानसिक रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले.

  3. या घटनेमुळे मंत्र्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar : राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. पुंडलीकनगर भागात सावे यांचे संपर्क कार्यालय आहे. ते आॅफिसमध्ये बसलेले असताना बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीवर एका तरुणाने दगड मारला. यात गाडीची काच फुटली. हा प्रकार पाहिल्यानंतर कार्यालयात उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी गाडीकडे धाव घेत दगडफेक करणाऱ्या तरुणाला पकडले.

दरम्यान, दगडफेक करणारा तरुण ज्याचे नाव गणेश सखाराम शेजूळ हा त्याच भागातील हनुमाननगरचा रहिवासी आहे. तो लोकाकंडून पैसे मागत असतो. सावे (Atul Save) यांच्या संपर्क कार्यालयातील कर्मचारी, पदाधिकारी देखील या तरुणाला पैसे देत होते, अशी माहिती आहे. आजही नेहमी प्रमाणे अतुल सावे संपर्क कार्यालयात बसलेले असताना हा तरुण पैसे मागून गोंधळ घालत होता. तेव्हा त्याला थोडे फार पैसे देऊन तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला.

पण कमी पैसे दिले म्हणून संतापलेल्या गणेशने शेजारी पडलेला दगड उचलला आणि तो सावे यांच्या उभ्या असलेल्या गाडीच्या समोरच्या बाजूच्या काचेवर मारला. (BJP) चालकाच्या शेजारील काच यामुळे फुटली. गाडीवर दगड फेकल्याचे समजताच सावेंचे कार्यकर्ते धावत आले आणि गणेश शेजूळ या तरूणाला पकडले. परंतु तो पैसे मागायला नेहमी येत असल्याने बरेच जण त्याला ओळखत होते. तो मनोरुग्ण असल्याची माहिती आहे.

ही माहिती कळताच पुंडलीकनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गणेश शेजूळ याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले. दरम्यान, दगडफेक करणारा तरुण हा मनोरुग्ण असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दगडफेक केल्यानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे समजताच कुटुंबियांनी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आमचा मुलगा मनोरुग्ण आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची कागदपत्र त्यांनी पोलीसांना दाखवली. अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची शहरभरात चर्चा आहे. परंतु या प्रकारानंतर अतुल सावे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

FAQs

प्र.1: अतुल सावे यांच्या कारवर दगडफेक कुठे झाली?
उ.1: छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली.

प्र.2: दगडफेक कोणी केली?
उ.2: एका मनोरुग्ण तरुणाने दगडफेक केली.

प्र.3: पोलिसांनी आरोपीला काय केले?
उ.3: पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे.

प्र.4: या घटनेनंतर काय प्रतिक्रिया उमटल्या?
उ.4: मंत्र्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्र.5: मंत्री अतुल सावे सुरक्षित आहेत का?
उ.5: होय, मंत्री अतुल सावे सुरक्षित आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT