Sanjay Raut Anil Deshmukh  sarkarnama
महाराष्ट्र

Nitesh Rane : नितेश राणेंचा संजय राऊत, अनिल देशमुखांवर प्रहार, फोटो दाखवत म्हणाले 'जैसी करनी वैसी भरनी!'

Nitesh Rane Sanjay Raut Anil Deshmukh : भाजप आमदार राणे यांनी संजय राऊत यांच्या नागपूरत दौऱ्यातील संजय राऊत यांचे अनिल देशमुखांच्या सोबतचे जेवण करतानाचे फोटो ट्विट करत 'गँग भोजन!' असे कॅप्शन दिले आहेत.

Roshan More

Nitesh Rane : मी आणि अनिल देशमुख कारागृहात होतो. आम्हाला कारागृहात पाठवण्यामागे भाजपच्या नागपूरमधील नेत्याचे षडयंत्र होते, असा आरोप संजय राऊत यांनी करत नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला होता. अनिल देशमुख यांनी देखील अनेकदा देवेंद्र फडणवीस यांनी मला तुरुंगात जायचे नसेल तर उद्धव ठाकरे यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी दबाव आणल्याचे म्हटले होते.

संजय राऊत नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील अनिल देशमुखांच्या सोबत जेवण करतानाचा त्यांचे फोटो ट्विट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी 'गँग भोजन!' असे कॅप्शन दिले आहे. तसेच एका कुख्यात गुन्हागारासोबत राऊत आणि देशमुख जेवण करत असून गुन्हेगारांसोबत रहाल तर जेलमध्ये जावेच लागणार, असा टोला लगावला आहे.

नागपूर दौऱ्यावर असलेले ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत विदर्भातील नेते विदर्भाला न्याय द्यायला सपशेल अपयशी ठरल्याचे म्हटले.देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण दूषित झाले असल्याचा आरोप देखील राऊत यांनी फडणवीसांवर केला होता. आपल्याला आणि अनिल देशमुखांना नागपूरमधील नेत्यामुळेच तुरुंगात जावे लागल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला होता.

नितेश राणेंनी डिवचले

नितेश राणे यांनी ट्विटरवर संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्यासोबत कुख्यात गुंड संतोष आंबेकर टोळीचा मोरक्या गौतम भटकर सोबत जेवण करत असल्याचे फोटो प्रसारित करत अशा गुन्हेगारांसोबत राहाल तर जेलमध्य जावेच लागणार, असे म्हटले आहे.

नितेश राणेंच्या ट्विटमध्ये काय?

हे आहेत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचा भोंगा संज्या.दोघेही बेलवर बाहेर आहेत. नागपुरात जेवणाचा आनंद घेत आहेत. हरकत नाही.पण बेलवरचे हे दोन्ही आरोपी कुणासोबत जेवतात तेही पहा. गौतम भटकर सोबत आहे.हा भटकर कुख्यात संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या. या भटकरवर मोक्का सुद्धा लागला, बलात्कार केला आणि त्याच तरुणीसोबत लग्न करून सुटला. खंडणीचे तर कित्येक गुन्हे त्याच्यावर आहेत. आता अशा गुन्हेगारांसोबत रहाल तर जेलमध्ये जावेच लागणार.मग भाषणात कशाला सांगता नागपूरच्या माणसामुळे आम्हाला जेलमध्ये जावे लागले!जैसी करनी वैसी भरनी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT