Nitesh Rane1  Sarkarnama
महाराष्ट्र

Nitesh Rane : नीतेश राणेंची अटक वॉरंटविरोधात धावाधाव, खासदार राऊतांचा बदनामीचा खटला

BJP MLA Nitesh Rane move to Bombay High Court to cancel the arrest warrant : खासदार संजय राऊत यांच्या बदनामीच्या खटल्यात आमदार नीतेश राणे यांना काढलेले अटक वॉरंट रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीच्या खटल्यात माझगाव न्यायालयाने भाजप आमदार नारायण राणे यांना अटक वॉरंट काढलं आहे.

अटक वॉरंट रद्द करण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या खटल्यात भाजप (BJP) आमदार नीतेश राणे यांना माझगाव न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. यात अटक टाळण्यासाठी नीतेश राणेंना 17 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे.

शिवसेना (Shiv Sena) नेते, खासदार संजय राऊत यांनी नीतेश राणेंविरोधात माझगाव न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात नीतेश राणे यांनी सुनावणीला दांडी मारली. वकिलांनी हजेरीपासून सूट देण्याची विनंती केली. मात्र खटल्यात वारंवार गैरहजर राहणाऱ्या नीतेश राणेंना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आरती कुलकरणी यांनी स्पष्ट नकरा देत थेट अजामीनपात्र वॉरंट बजावले.

नीतेश राणे खटल्यात गांभीर्यानं वागत नसल्याचं निरीक्षक न्यायालयाने नोंदवल आहे. तसंच अटक टाळण्यासाठी 17 ऑक्टोबरला आमदार राणेंना न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. मात्र नीतेश राणे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी आमदार राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नीतेश राणेंना न्यायालयाने दंड केला

आमदार नीतेश राणे यांना यापूर्वी 30 जानेवारीला माझगाव न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढलं होते. आमदार राणे यावर देखील हजर राहण्यास टाळाटाळ केली. नीतेश राणेंनी यापूर्वी जिल्हा सत्र आणि नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र दोन्ही न्यायालयांनी वॉरंटविरोधातील अर्ज फेटाळले. अखेर 26 फेब्रुवारीला नीतेश राणेंना दंडाधिकाऱ्यांपुढे येत, न्यायालयाने सक्त ताकीद देत दंड ठोठावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT