Suresh Dhas News : वाल्मिक कराडवर आरोप करताना मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही, असे सुरेश धस सांगत होते. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्या पक्षातून होत असल्याचे स्पष्टीकरण देखील ते देत होते. मात्र, त्यांची आणि मुंडेंची भेट झाल्याने सुरेश धस यांच्याभोवती संशयाचे धुके दाटले होते. आज (गुरुवारी) पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत थेट राजीनाम्याचीच मागणी केली.
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना कृषी साहित्याच्या खरेदीमध्ये तब्बल 300 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे. तसेच अजितदादा पवार यांच्यावर जेव्हा 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले झाले होते. सातत्याने आरोप होत असताना त्यांनी राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यायला हवा. धनंजय मुंडे खुर्चीला चिटकून का बसलेत? असा प्रश्न देखील धस यांनी विचारला.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर त्याचा सर्वाधिक फायदा अजितदादांच्या राष्ट्रवादीलाच होईल, असा दावा देखील सुरेश धस यांनी केला.
धनंजय मुंडेंच्या सोबत झालेल्या भेटीवर बोलताना सुरेश धस म्हणाले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भेटीबद्दल बोलताना आम्ही साडेचार तास भेटलो असे म्हटले होते. मात्र, त्यांनी खुलासा केला की अर्धा तास ऐवजी ते चुकून साडेचार तास बोलले. मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी तीन चार वेळा हा खुलासा केला. धनजंय मुंडे आणि माझी भेट फक्त 20 मिनिटांची होती, असे देखील सुरेश धस म्हणाले.
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना म्हणाले, माझ्याकडे सर्व माहिती आहे. अंजली दमानिया यांच्याकडे सर्व माहिती नव्हती. तेव्हा तुम्ही त्यांना अर्थवट माहिती देत आहेत म्हणून अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. आत्ता माझ्यावर देखील 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा खटला दाखला करा मी घाबरत नाही, असे चॅलेंजच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.