Dharashiv Shivsena : धाराशिवमध्ये पाऊल ठेवताच पालकमंत्री सरनाईकांचे मोठे विधान; म्हणाले, 'दोनवेळा जाळ्यात अडकलेला वाघ..'

Sarnaik Dharashiv visit news: पुन्हा एकदा पालकमंत्री सरनाईक धाराशिव जिल्ह्यात आल्यानंतर ऑपरेशन टायगरवरून मोठे विधान केले आहे.
Pratap Sarnaik
Pratap Sarnaik Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पहिल्यांदाच आल्यानंतर राज्यात ऑपरेशन टायगर व ऑपरेशन धनुष्यबाण राबवले जात असल्याचे सांगितले होते. या माध्यमातून राज्यातील अनेक आमदार, खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातदेखील काही बदल झाला तर तुम्हाला वेगळे काही वाटायला नको, असे विधान त्यांनी केले होते. त्यांनी केलेल्या या विधानानंतर धाराशिव जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच पुन्हा एकदा पालकमंत्री सरनाईक धाराशिव जिल्ह्यात आल्यानंतर ऑपरेशन टायगरवरून मोठे विधान केले आहे.

धाराशिवमधील ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांना महायुतीसोबत घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, शिवसेनेच्या या 'ऑपरेशन टायगर'ची खिल्ली उडविताना ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी धाराशिवमध्ये यवतमाळहून आलेला वाघ आधी पकडा, असा टोला लगावत, या दाव्यातील हवाच काढली होती. काही ठिकाणी ऑपरेशन टायगर यशस्वी झाले तर काही ठिकाणी या ऑपरेशनचा फज्जा उडाला आहे.

Pratap Sarnaik
Shivsena Politics : गद्दारी, कोणासोबत? वैभव नाईकांनी घेतली शिवजयंतीला शपथ...

त्यानंतर आता पुन्हा एकदा पालकमंत्री सरनाईक दोन दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱयावर आले आहेत. यावेळी पत्रकारांनी पुन्हा ऑपरेशन टायगरविषयी विचारणा केली असता सरनाईक म्हणाले, 'यापूर्वी दोन वेळा जाळ्यात अडकलेला वाघ योग्य ठिकाणी इंजेक्शन न दिल्याने सुखरूप बाहेर सुटला होता. मात्र, आता येत्या काळात सावज टप्प्यात आल्यानंतर डॉक्टर एकनाथ शिंदे स्वतः कार्यक्रम करणार असल्याचे स्पष्ट केले.

Pratap Sarnaik
Uddhav Thackeray : पक्षातील नेत्यांवर टीका करणे भोवले; 'या' प्रवक्त्याला उद्धव ठाकरेंनी दाखवला घरचा रस्ता

गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे शिवसेनेच्या रडारवर आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळी कैलास पाटील त्यांच्या सोबत गुवाहाटीला न जाता सुरतवरूनच माघारी परतले होते. त्यामुळे त्यावेळेसपासून शिवसेना गळ टाकून आहे. धाराशिव जिल्ह्यात या पूर्वी दोन वेळा ऑपरेशन टायगर राबविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

Pratap Sarnaik
Chagan Bhujbal: जिल्हा बँकेच्या नोटीसीवरून भुजबळांचा थयथयाट; आम्ही तर म्हणतोय की सोडवा एकदाचे

गेल्या वेळेस योग्य ठिकाणी इंजेक्शन लागले नाही. आता मात्र तयारी पूर्ण केली आहे. येत्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ऑपरेशन करणार असून सावज टप्प्प्यात आले की इंजेक्शन टोचण्यात येईल, असे सांगत पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ठाकरे सेनेला सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे आता येत्या काळात ठाकरे सेनेकडून या प्रतिक्रियेवर कशा प्रकारे उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pratap Sarnaik
Delhi BJP Strategy : दिल्लीत राजस्थानप्रमाणे भाजपचे धक्कातंत्र; आणखी दोन वेगळ्या पॅटर्नची चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com