Mumabi News : भाजपच्या वाट्याला आलेल्या विधानपरिषदेच्या तीन जागांवरील उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे पदवीधरसाठी भाजपने धक्कातंत्र अवलंबले असून शरद लाड यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यांच्या ऐवजी स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या वाट्याला आलेल्या तीन मतदारसंघातील इच्छुकांची यादी घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे शनिवारी सकाळी दिल्लीला गेले होते. याठिकाणी भाजपच्या हायकमांडसोबत त्यांची बैठक पार पडली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या समवेत चव्हाण यांची बैठक झाली. त्यानंतर या तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे रविवारी दुपारी जाहीर करण्यात आली.
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून (BJP) शरद लाड, यांचे नावे चर्चेत होते. मात्र ऐनवेळी भाजपकडून धक्कातंत्र अवलंबण्यात आले. याठिकाणी ऐनवेळी स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून तयारी करीत असलेल्या शरद लाड यांना मोठा धक्का मानला जात आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी आमदार अनिल सोले यांच्याही नावाची चर्चा होती.
पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपकडून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.. शिक्षण महर्षि बापुजी साळुंखे शिक्षणसंस्थेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम बघत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही गावडे यांच्या उमेदवारीसाठी शब्द टाकला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.