BJP Politics: सत्ताधारी भाजप नेत्यांचाच पोलिसांवरील विश्वास उडाला; नंदुरबार अवैध धंद्यांचे रॅकेट!

Nandurbar BJP leaders demanded action against alleged illegal Businesses: नंदुरबारमधील कथित अवैध दारूविक्री, जुगार, मटका आणि अमली पदार्थांच्या व्यवसायांवर कारवाईची मागणी भाजप नेत्यांनी केली. पोलिस अधीक्षकांना निवेदन देत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
Maharashtra police
Maharashtra police Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nandurbar Police news: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था विरोधकांच्या टिकेचा विषय राहीला आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात घड्याळाचे काटे उलटे फिरले आहेत. सत्ताधारी भाजप नेत्यांनीच याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गृहखाते काम करते. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला पारदर्शक ठेवणे पोलिसांचे काम असते. काहीवेळा हा प्रश्न विरोधकांसाठी राजकारणाचा विषय असतो. नंदुरबार जिल्ह्यात मात्र राज्यातील सरकारला सत्ताधारी भाजपनेच घरचा आहेर दिला आहे.

यासंदर्भात भाजपच्या नेत्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांची भेट घेऊन पोलीस यंत्रणेला धारेवर धरले. नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. दारू विक्री, मटका, जुगार आणि गुन्हेगारी वाढली आहे. त्यावर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

नंदुरबार हे गुजरात राज्याच्या सीमेवरील राज्य आहे. आदिवासी जिल्हा असल्याने येथील कायदा आणि सुव्यवस्था हा संवेदनशील विषय आहे. अशात विरोधी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सुरातसूर मिसळण्याचे काम भाजपने केले आहे.

Maharashtra police
Gokul Election : गोकुळमधील अदृश्य शक्तींचा पहिल्यांदा भांडाफोड : हसन मुश्रीफांचे धनंजय महाडिकांवर नाव घेऊन आरोप

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड सत्यानंद गावीत, मोहन खानवानी, पंकज पाठक, समिधा नटावदकर, कैलास चौधरी, डॉ सपना अग्रवाल यांसह विविध नेत्यांच्या शिष्टमंडळाने याबाबत गृह विभागाच्या कारभारावर टीका केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस यंत्रणेवरील दाखविलेला हा अविश्वास राजकीय कार्यकर्त्यांत चर्चेचा विषय ठरला आहे. या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने पोलिसांना अवैध धंद्यांवर निर्वाणीचा इशारा देखील दिला.

Maharashtra police
MPSC Students Morcha : MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! सचिव, अध्यक्षांच्या राजीनाम्यावर ठाम, आज पुण्यात मोर्चा; काँग्रेसचा पाठिंबा

शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष हा भाजपचा सत्तेतील भागीदार आहे. या संदर्भात आमदार आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेत पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप केले होते. आता खुद्द भाजपच्या नेत्यांनीच त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com