Mumbai News : भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या कालच्या जोडो मारो आंदोलनासह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
"शरद पवार यांनी या वयात छत्रपतींच्या कल्याणकारी महाराष्ट्र निर्माणासाठी काम करायला पाहिजे. शांततेसाठी मोर्चा काढला पाहिजे. परंतु त्यांची प्रत्येक कृती संशयास्पद असते. पेट्रोल टाकून ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, अशा कृतीला महाराष्ट्रात स्थान नाही. शातंतेऐवजी ते लावालावी करतात", असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत 'मविआ'च्या कालच्या जोडे मारो आंदोलनावर टीका केली. उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar), संजय राऊत आणि काँग्रेसवर निशाणा साधताना सर्वाधिक शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी निशाण्यावर घेतले. "शरद पवार यांनी महाराष्ट्रात शांततेसाठी, सलोख्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण ते करताना दिसत नाही. आजही ते लावालावी करतात", असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला.
नारायण राणे म्हणाले, "शरद पवार त्यांच्या या वयात महाराष्ट्र शांत, सलोख्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. आजही लावालावी करतात. जाती-जातमध्ये तेढ निर्माण करत आहेत. चारवेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मंत्री असताना, त्यांनी आरक्षणाची (Reservation) टक्केवारी वाढवली नाही. आता म्हणत आहेत की, राज्य सरकारने जावं आणि 52 टक्क्यांच्या पुढे वाढवून घ्यावं". चार वेळा मुख्यमंत्री होते, मराठा मुख्यमंत्री होते, का केलं नाही? असा सवाल करत ही भांडणं अभिप्रेत आहे का? लोकांची मनं पेटवता!,असा आरोप देखील नारायण राणे यांनी केला.
जातीचे राजकारण नको. पुतळा पडला, एकत्र येऊ या. चांगला पुतळा उभारू या. देखणा पुतळा उभारू. बोलला असता, तर किर्ती वाढली असती, असा सल्ला देखील नारायण राणे यांनी शरद पवार यांना दिला. पण शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात, पण ते राजकारण खेळत आहे. वय वर्षे 83 पर्यंत स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत. आता मराठा आंदोलनात घुसलात, ज्यांना कोणाला घेऊन, मला त्याची माहिती आहे. माझे पण इंटेलिजिन्स डिपार्टमेंट स्वतंत्र आहे, असे सांगून मला फोनवर शिवीगाळ करणारा पवारांचाच कार्यकर्ता निघाल्याचा आरोप नारायण राणे यांन केला.
"छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोककल्याणकारी बनावा, हे धान्यी-मनी शरद पवारांकडे असायला हवे. पेट्रोल टाकून ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, याला महाराष्ट्रात स्थान नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांनी समजून घेतले, पाहिजे", असेही नारायण राणे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.