Thackeray Vs Shinde : मुंबई वायव्य लोकसभेतील वादावर मोठी अपडेट; रवींद्र वायकरांना हायकोर्टाने दिले 'हे' निर्देश...

Loksabha Election Result Dispute : अमोल किर्तीकर यांच्या याचिकेनुसार उच्च न्यायालयाने रवींद्र वायकर यांना नोटीस पाठवली आहे. मुंबई वायव्य मतदारसंघाच्या निकालाच्या वादावर चार आठवड्यांत आपले म्हणणे मांडण्यात यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने वायकर यांना दिले आहेत.
Ravindra Waikar-Amol Kirtikar
Ravindra Waikar-Amol KirtikarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 02 September : लोकसभा निवडणुकीत मुंबई वायव्य मतदारसंघातील निकाल राज्यात सर्वाधिक गाजला होता. शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना विजयी घोषित केल्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यावर उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबई वायव्यमधील वाद अजूनही धुमसत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई वायव्य मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक सर्वाधिक चुरशीची ठरली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिंदे गटात प्रवेश करत रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती.

त्या निवडणुकीत वायकर यांना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते गजानान किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांनी आव्हान दिले होते. या मतदारसंघातील निवडणूक ही शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरली होती.

Ravindra Waikar-Amol Kirtikar
Mahayuti Seat Allotment : महायुतीच्या जागावाटपाबाबत बावनकुळेंचे मोठे विधान; 176 जागांवर एकमत, मतभेद असणाऱ्या 112 जागा कोणत्या?

ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांना मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, फेरमतमोजणीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्या बाजूने निकाल देत त्यांचा ४८ मतांनी विजय जाहीर करण्यात आले होता. त्या निर्णयाच्या विरोधात अमोल किर्तीकर हे उच्च न्यायालयात गेले होते, त्यावर आज सुनावणी झाली.

अमोल किर्तीकर यांच्या याचिकेनुसार उच्च न्यायालयाने रवींद्र वायकर यांना नोटीस पाठवली आहे. मुंबई वायव्य मतदारसंघाच्या निकालाच्या वादावर चार आठवड्यांत आपले म्हणणे मांडण्यात यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने वायकर यांना दिले आहेत. त्यावर आता वायकर यांच्या वतीने न्यायालयात काय उत्तर दिले जाते, हे पाहावे लागणार आहे.

Ravindra Waikar-Amol Kirtikar
Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध कोणाचा? नाथाभाऊंनी सांगितला पुढचा राजकीय प्लॅन...

मुंबई वायव्य मतदारसंघातून निवडून आलेले रवींद्र वायकर यांचा विजय रद्द करण्यात यावा, यासाठी अमोल किर्तीकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर उच्च न्यायालयाने चार आठवड्यात आपले म्हणणे मांडावे, असे आदेश खासदार वायकर यांना दिले आहेत.

ठाकरे आणि शिंदे गटात आता लोकसभा निवडणुकीतील निकालावरून न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com