Eknath Khadse : खडसे 'राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करणार' म्हणताच भाजपकडून आली पहिली प्रतिक्रिया...

Eknath Khadse News : लोकसभेपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपत पुन्हा जाणार असल्याची घोषणा केली होती. भाजपच्या केंद्रीत नेतृत्वाची त्यांनी भेटही घेतली होती. पण...
eknath khadse.jpg
eknath khadse.jpgsarkarnama
Published on
Updated on

माझ्या प्रवेशाला काहींनी विरोध केलेला दिसतो आहे, त्यामुळे तो जाहीर झालेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आजही आमदार आहे. मी आणखी काही दिवस भारतीय जनता पक्षाच्या निर्णयाची वाट पाहीन. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करून उत्साहाने काम करेन, असं विधान आमदार एकनाथ खडसे यांनी केलं आहे. खडसेंच्या विधानानंतर कुणी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे.

लोकसभेपूर्वी एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांनी भाजपत पुन्हा जाणार असल्याची घोषणा केली होती. भाजपच्या केंद्रीत नेतृत्वाची त्यांनी भेटही घेतली होती. पण, अजूनही खडसे यांचा अधिकृत प्रवेश झाला नाही. त्याच पार्श्वभूमीवर खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, एकनाथ खडसे भाजपसोबत राहतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

eknath khadse.jpg
Katol Assembly Election: डझनभर इच्छुक! पण अजितदादांच्या मनात दुसराच उमेदवार? 'विजयगड'वर खलबतं

चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) म्हणाले, "खडसे साहेब काय बोलले मला माहिती नाही. पक्ष खडसे यांना निवडून आणण्यासाठी खडसे साहेबांनी महायुतीला मदत केली आहे. ती मदत पुढील काळातही खडसे साहेब करतील. ते आमच्यासोबत राहतील."

एकनाथ खडसे काय म्हणाले?

एकनाथ खडसे यांनी म्हटलं, "भाजपचे अध्यक्ष, जे. पी. नड्डा. सचिव विनोद तावडे, मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश झाला आहे. त्याचे फोटोही काढलेले आहेत. मात्र, माझ्या प्रवेशाला काहींनी विरोध केलेला दिसतो आहे, त्यामुळे तो जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत भाजपत राहणं योग्य नाही, मी लवकरच माझा राजकीय निर्णय घेणार आहे."

eknath khadse.jpg
Devendra Fadnavis : सत्ता अन् यंत्रणांच्या 'गिअर'ने फडणवीसांनी नेते 'क्लच'मध्ये ठेवले; पण जनतेच्या रूळावर भाजपची गाडी 'स्लो'

"भाजपमध्ये प्रवेश करावा, असं माझं मत होतं. भाजप प्रवेशामागं माझी काही कारणं होती. त्याबाबतची मिमांसा मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे केली होती. माझ्या काही अडचणी होती, त्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करावा, असं वाटलं होतं," असंही खडसे म्हणाले.

"मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा मी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. मात्र, त्या दोघांनी माझा राजीनामा अजूनही स्वीकारलेला नाही. आजही मी आमदार आहे. आमदारकीचा राजीनामा देण्यास मला शरद पवार यांनी मनाई केलेली आहे. पण, मी आणखी काही दिवस भारतीय जनता पक्षाच्या निर्णयाची वाट पाहीन. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करेन आणि राष्ट्रवादीचे उत्साहाने काम करेन," असेही खडसेंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com